शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नोटबंदी वर्षपूर्ती; जिल्ह्यात काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानक नोटबंदी जाहीर केली.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आयोजन : चंद्रपुरात धरणे व मोर्चा, कार्यकर्त्यांनी केले काळे वस्त्र परिधान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानक नोटबंदी जाहीर केली. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी होरपळले गेले. या निर्णयाचा निषेध म्हणून चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी बुधवारी काळा दिवस पाळून धरणे आंदोलन करण्यात आले.चंद्रपुरात जटपुरा गेट व गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले. जटपुरा गेट येथे राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. धरणे आंदोलनासाठी उभारण्यात आलेला मंडपही काळ्या रंगाचा उभारण्यात आला होता. यावेळी जिल्हा काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर विधानसभा प्रमुख महेश मेंढे, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभासिंह गौर, माजी प्रदेश सचिव सुनिता लोढिया, अनुसूचित जाती विभाग प्रदेश महासचिव संजय रत्नपारखी, महिला प्रदेश महासचिव नंदा अल्लूरवार, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा जीवतोडे, शहर अध्यक्ष अनिता कथडे, विनोद संकत, अ‍ॅड. शाकीर मलक, प्रा. अनिल शिंदे, अनिल सुरपाम यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपा सरकारच्या नोटबंदी व जीएसटी निर्णयाचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.दुसरे आंदोलन गांधी चौकात महानगरपालिकेसमोर करण्यात आले. तत्पूर्वी माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात नगरसेवक गजानन गावंडे, नगरसेवक अशोक नागापुरे, नगरसेवक कुशल पुगलिया, प्रविण पडवेकर, सकिना अन्सारी, ललिता रेवेल्लीवार, महेंद्र जयस्वाल, राजेश रेवेल्लीवार, बापू अन्सारी, भारत जंगम, कामगार नेत साईनाथ बुचे, देवेंद्र बेले व असंख्य कार्यकर्ते काळ्या रंगाचे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. त्यानंतर महापालिकेसमोर मोदी सरकारच्या निषेधाचे व काळ्या दिवसाचे फलक हातात घेऊन केंद्र व राज्य शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या.यासोबतच चिमूर, सिंदेवाही, सावली यासह इतर ग्रामीण भागातही बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळा दिवस पाळून केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला.राजुºयात काळा दिवसमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांच्या संपर्क कार्यालयासमोर राजुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या नोटबंदी वर्षपूर्तीच्या निषेधार्थ हाताला काळीपट्टी बांधून काळा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शासनाच्या नोटबंदीचा निषेध नोंदविला. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादा पाटील लांडे, नगराध्यक्ष अरूण धोटे, पंचायत समिती सभापती कुंदा अविनाश जेनेकर, जिल्हा परिषद सदस्या मेघा दिलीप नलगे, पं. स. सदस्य तुकाराम माणूसमारे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक देशपांडे, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप नलगे, बांधकाम सभापती आनंद दासरी, नगरसेवक गजानन भटरकर, गीता रोहने, संदेश करमरकर, देविदास टिपले, राजुरा काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, सेवादलाचे अध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे विजय उपरे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, साजीद बियाबानी, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एजाज अहमद, सचिव अशोक राव, बामनवाडाचे सरपंच राजेश चौधरी, चिंचोलीचे माजी सरपंच वसंत ताजणे, धोपटाळाचे माजी सरपंच राजाराम येल्ला, धनराज चिंचोलकर उपस्थित होते.पोंभूर्ण्यातही आंदोलनपोंभूर्णा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे देऊन काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी नगरसेवक अतिक कुरेशी, गिरीधरसिंह बैस, मुरलीधर टेकाम, अशोक गेडाम, जयपाल गेडाम, पराग पुलकमवार, अशोक सिडाम, विजय वासेकर, निलकंठ नैताम, सुनिल कुंदोजवार, रामदास रामटेके आदी उपस्थित होते. तहसीलदारांमार्फत राष्टÑपतींना निवेदन पाठविण्यात आले.ब्रह्मपुरीत निषेधब्रह्मपुरी : काँग्रेस, मजदूर काँग्रेस, किसान काँग्रेस, सेवादल काँग्रेसच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक येथे नोटबंदीचा काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी नारायणराव बोकडे, प्रा. जगनाडे, विजय तुमाने, गणी खान, गणेश कºहाडे, संजय हटवार, भगवान कुसरे, इनायत खान, बी.आर. पाटील, दर्शन नाकमोडे, नंदू गुड्डेवार, शालिक सहारे, वामनराव मिसार, दिवाकर मंडपे, योगीराज पारधी, विजय बनपूरकर, रामकृष्ण महाजन, काशिनाथ खरकाटे, रामटेके गुरुजी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.