शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कितीही मोठे झाले तरी समाजऋण विसरू नका

By admin | Updated: July 5, 2017 01:09 IST

कोणतेही क्षेत्र हे कमी दर्जाचे नसते, ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे. त्या क्षेत्राची निवड करून स्वक्तृाने पुढे जा, ...

विजय देवतळे : खैरे कुणबी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोणतेही क्षेत्र हे कमी दर्जाचे नसते, ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे. त्या क्षेत्राची निवड करून स्वक्तृाने पुढे जा, समाजाचा नावलौकिक वाढवा, भविष्यात कितीही मोठे झाले तरीसमाजाचे विस्मरण होऊ न देता समाज ऋण फे डण्यासाठी सदैव तत्पर राहा असे आवाहन खैरे कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय देवतळे यांनी केले.जिल्हा खैरे कुणबी समाज संघटनेतर्फे स्थानिक मातोश्री सभागृहात आयोजित खैरे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थी व लोक प्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पोंभूर्णा पं.स.चे उपसभापती विनोद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मूलच्या नगराध्यक्षा प्रा. रत्नामाला भोयर, शीला मशाखेत्री, समाजाचे ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, जि. प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे, वैशाली शेरकी, योगिता डबले, मनिषा चिमूरकर, समाज कल्याण अधिकारी विजय वाकूलकर, प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर, वरोरा न.पं.चे उपाध्यक्ष अनिल झोटिंग पं.स.सदस्या मनिषा जवादे, डॉ.बी.के़ लोणारे, दिनकर ढोंबरे, प्रा. महेश पाणसे, प्रा. अनिल चौखुंडे, डॉ. अश्विनी बोकडे, प्राचार्य मांडवकर, बंडू भोज, समीर भोयर, सुधाकर पांडव, सुधाकर चरडूके आदी उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थी हे समाजाचे भूषण असल्याचे सांगितले. तर रत्नमाला भोयर, आरेकर, डॉ. आसावरी देवतळे, योगिता डबले यांनही सत्काराला उत्तर देताना समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त करीत समाज बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता १० वीच्या १०५ विद्यार्थ्यांचा तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी, आचार्य पदवी प्राप्त मान्यवर आणि मिमिक्री पेंन्टींग, नृत्य आदी कला जोपासणाऱ्या कल्पक चिंचोलकर या विद्यार्थ्यांच्या समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवतळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक खुशाल बोंडे, संचालन समाजाचे सचिव जे.डी.पोटे यांनी तर आभार तोमाजी झाडे यांनी मानले. यशस्वीतेकरिता विठ्ठल धोटे, अरून भोयर, अभय किनेकर, विकास पाचभाई, जगदीश गुरकडे, विलास खडसे, विजय रोहनकर, बोरकर, धनंजय पोटे आदींनी प्रयत्न केले.