चंद्रपूर : आर्थिक मागास वर्गातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. सत्र २०२०-२१ च्या परीक्षेचा अंतिम निकाल लागला आहे. यामध्ये छोटूभाई पटेल हायस्कूलच्या ९ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना १२ हजार रुपये प्रतिवर्ष प्रमाणे पुढील चार वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे. रिना लांजेवार, प्राची खारकर, आर्यन वानखेडे, अनया पाल, त्रिष्णा भदौरिया, छगन बानकर, वसुधा बावणे, तनिष्क लांडगे, खुशी वरारकर या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
आदर्श शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जिनेशभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापिका सवाने, उपमुख्याध्यापिका परिहार, पर्यवेक्षक मानकर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.