नवीन विश्रामगृहामुळे ताडोबाच्या पर्यटनाला अधिक उंची मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:51 PM2018-08-17T22:51:51+5:302018-08-17T22:52:12+5:30

ग्रीन गोल्ड, ब्लॅकगोल्ड आणि हमखास व्याघ्र दर्शन घडविणाऱ्या ताडोबा अभयारण्याचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची जगभर प्रसिद्धी आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याच तुलनेच्या विश्रामगृहाची आवश्यकता होती. वनविभागाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कमतरता दूर केली असून ताडोबाच्या पर्यटनाच्या उंचीला नवा आयाम देणारे हे विश्रामगृह लोकार्पित करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

The new lodging will get higher Tadoba tourism | नवीन विश्रामगृहामुळे ताडोबाच्या पर्यटनाला अधिक उंची मिळेल

नवीन विश्रामगृहामुळे ताडोबाच्या पर्यटनाला अधिक उंची मिळेल

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ताडोबाच्या विश्रामगृहाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रीन गोल्ड, ब्लॅकगोल्ड आणि हमखास व्याघ्र दर्शन घडविणाऱ्या ताडोबा अभयारण्याचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची जगभर प्रसिद्धी आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याच तुलनेच्या विश्रामगृहाची आवश्यकता होती. वनविभागाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कमतरता दूर केली असून ताडोबाच्या पर्यटनाच्या उंचीला नवा आयाम देणारे हे विश्रामगृह लोकार्पित करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
रामबाग नर्सरीमध्ये विभागीय वनविभामार्फत वनविश्रामगृहाची निर्मिती ताडोबा बघायला येणारे संशोधक, विदेशी पाहुणे, अभ्यासक व ताडोबामध्ये रुची ठेवणाºया राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मान्यवरांना अपेक्षित सर्व पद्धतीच्या आधुनिक सुविधायुक्त करण्यात आली आहे. नऊ अद्ययावत कक्ष, बैठक कक्ष, परिषद कक्ष, प्रतिक्षालय असे दोन मजल्यांचे हे देखणे विश्रामगृह चंद्रपूर वनविभागाने लोकार्पित केले.
कार्यक्रमाला आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापक ऋषीकेश रंजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अधीक्षक अभियंता सुष्मा साखरवाडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वनमंत्री म्हणून विविध सुधारणा आपल्या कार्यकाळात केल्याचे समाधान आहे. या भागाची सेवा अधिक क्षमतेने करण्यासाठी वनखाते आपण मागितले होते. गेल्या काही वर्षात वृक्ष लागवडीच्या मोहिमेसह विविध योजनांच्या माध्यमातून वनावर अंवलबून असलेल्या जनेतेसाठी काम करु शकल्याचे त्यांनी सांगितले.
ताडोबा जागतिक पर्यटन केंद्र होत असताना या भागात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा राबता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, देशातील उद्योगसमूह, विविध क्षेत्रातील सेलीब्रीटी वनविभागाच्या विविध योजनात सहभागी होत आहेत. वनविभागातील उपक्रमांसाठी येणाºया पाहुण्यांना विशेष दर्जा वनविभागाने दिला आहे. त्यामुळे त्यांना दर्जेदार निवास व्यवस्थेची आवश्यकता होती. या निवासस्थानामुळे ताडोबाच्या पर्यटनाला व नव्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांची बदली झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी केले. संचालन व आभार दत्तप्रसाद महादानी यांनी केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
वृक्ष लागवडीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान
वनविभागाने राबविलेल्या वृक्षलागवडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. सिंगापूर कॉन्सिलेटने त्यांच्या स्वातंत्र्य दिवसाला उपस्थित ६३ देशांच्या प्रतिनिधींना एक महिन्यामध्ये १३ कोटी वृक्षलागवड कशाप्रकारे केली, याबाबत माहिती दिली. यामुळे अमेरिकेच्या राजदूतांना या मोहिमेचे आकर्षण निर्माण झाल्यामुळे त्यांनी आपल्या देशात मोहीम राबवण्यावर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The new lodging will get higher Tadoba tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.