शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नव्या जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 23:16 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या बदलीमुळे त्यांच्या जागी मुंबई राज्य गुप्तचर विभागातील उप आयुक्त रवींद्रसिंग परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे. गुप्तचर विभागातील त्यांच्या अनुभवाने ते शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरची ओळख शांतताप्रिय जिल्हा म्हणून आहे. विविध जाती-धर्मांचे, विविध राजकीय पक्षांचे दिग्गज पुढारी या जिल्ह्यात वास्तव्यास असले तरीही जिल्ह्यात कोणतीही जातीय किंवा राजकीय दंगल झाली नाही. असे असले तरीही मागील काही वर्षांत मात्र येथील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मर्डर, चोरी, छेडछाड, अत्याचाराच्या घटना या नित्याच्याच झाल्या आहेत. यावर आळा घालण्याचे आव्हान नवे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्यापुढे उभे ठाकले आहे. ही आव्हाने ते कशी पेलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. अन् तेव्हापासून गुन्हेगारीला नवे स्वरूप आले. पैसे कमविण्याच्या नादात अनेक युवा तरुण अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात गुंतले अन् यातूनच संघटित गुन्हेगारीला सुरुवात झाली. भर चौकात दारू विक्रीच्या वादातून अनेक हत्या झाल्या. ड्रग्ज, गांजाचीही सर्रास विक्री होऊ लागली. आता दारूबंदी उठली असली तरीही जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीही सुरूच आहे. तर अनेक दारूविक्रेते घरफोडी, चोरी, दुचाकी चोरी करीत असल्याचे काही कारवायांतून पुढे आले आहे. त्यामुळे शांततापूर्ण असलेल्या जिल्ह्याचे वातावरण गुन्हेगारीने ढवळून निघत आहे. यावर अंकुश लावण्याचे आव्हान नुकताच पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेल्या रवींद्रसिंग परदेशी यांच्यापुढे आता उभे ठाकले आहे.   

दरोडे अन् चोऱ्या वाढल्या- मागील तीन ते चार वर्षांपूर्वी शहरात छोट्या-मोठ्या चोऱ्या, घरफोडीची नोंद असली तरी मागील दोन वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यातील धाडसी दरोडा पडल्याचेही समोर आले आहे. वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र तर चक्क चारवेळा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर पाचव्या वेळी संपूर्ण रोकड पळविण्यात आली. - वरोरा बँक ऑफ इंडिया येथून दिवसाढवळ्या १६ लाख रुपयांची रक्कम पळविण्यात आली होती.  भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील कोकण बँकेतही दरोडा पडला. घोडपेठ येथील एक बँक फोडण्याचा प्रयत्न केला होता. यासोबतच चंद्रपुरातील एका व्यापाऱ्याच्या घरून बेडखाली ठेवलेली पैशाची बॅगच दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून पळविली. तर दुसऱ्या एका व्यापाऱ्याचे पैसे बँकेत भरण्यासाठी गेल्यानंतर पळविले होते. 

नव्या पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षाजिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या बदलीमुळे त्यांच्या जागी मुंबई राज्य गुप्तचर विभागातील उप आयुक्त रवींद्रसिंग परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे. गुप्तचर विभागातील त्यांच्या अनुभवाने ते शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे

अत्याचार व विनयभंगाची आकडेवारी चक्रावणारी - मागील काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात मुली व महिलांची छेडछाड, विनयभंग व अत्याचारांची आकडेवारीही वाढली आहे. - पोलीस विभागाकडून शाळा - महाविद्यालयांत याबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी अत्याचार व विनयभंगाची आकडेवारी चक्रावणारी आहे

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी