शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ना आधारकार्ड, ना रेशनकार्ड; जिवंत असल्याचा पुरावा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:57 IST

Chandrapur : भटक्या-जमातीतील कुटुंबाची अशीही व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही या देशातल्या व चंद्रपूर जिल्ह्यातील भटके-विमुक्तांकडे अद्यापही रेशनकार्ड, आधारकार्ड व मतदारकार्डही नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. अशा या भटक्या कुटुंबाकडे जिवंत असल्याचा पुरावा काय, असा प्रश्न पडत आहे.

चंद्रपूर शहरातील नागपूर रोड, दाताळा रोड यासोबतच गडचिरोली रोड, बल्लारपूर रोड येथे अनेक भटक्या समाजातील अनेक भटके कुटुंब वास्तव्यास आहेत. व्यवसायासाठी ते गावोगावी भटकत असतात. गॅस शेकडी, कुकर दुरुस्ती, गोणे व फन्ऱ्या शिवणे, किंगरी व दमसाहेब वाजवून ते कुटुंबाचे पालनपोषण करतात. या पालातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. यांच्यातील बहुतांश जणांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नसल्याने यांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. 

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच मतदारकार्ड नाही तात्पुरती वस्ती करून राहणाऱ्या अनेकांकडे मतदान कार्ड नाही. एवढेच नाही तर अनेकजण शिक्षणापासून दूर आहेत. ते समाजाच्या मुख्य प्रवाहापासूनच दूरच आहेत.

रेशनकार्ड नाही कुठलेही कागदपत्रे नसल्यामुळे या भटक्या लोकांकडे रेशनकार्ड नाही, त्यामुळे त्यांना शासकीय धान्याचा लाभ मिळत नाही.

आधारकार्ड नाही पालात राहणाऱ्या बहुतांश लोकांकडे आधारकार्ड नाही. त्यांना स्वतःची ओळख पटवून देताना अडचणी निर्माण होत आहेत.

एकही प्रमाणपत्र नाही अशा कुटुंबाकडे आधारकार्ड, मतदारकार्ड, रेशनकार्ड नाही. हातावर आणून पानावर खाणे ही त्यांची परिस्थिती आहे.

कुठल्याचा शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक कागदपत्र जोडावे लागतात. परंतु, या लोकांकडे कुठलेही प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.

कागदपत्रे देण्यात अडचण काय? कामधंदा करायचा आणि पोटाची खळगी भरायची यावरच त्यांचे लक्ष केंद्रित असते. कागदपत्र गोळा करण्यासाठी पुरावे लागतात.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर