शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

संशोधनाभिमुख शिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर व चंद्रपूर जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत चंद्र्रपूर येथील सैनिक शाळेत आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सोमवारी ते बोलत होते.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : जिल्हास्तरीय इंस्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये संशोधनाला अधिक महत्त्व देणे गरजेचे असून आजचे शिक्षण हे संशोधनाभिमुख होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर व चंद्रपूर जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत चंद्र्रपूर येथील सैनिक शाळेत आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सोमवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले तर प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष रेखा कारेकर, सैनिक शाळेचे स्क्रॉडन लिडर प्राचार्य नरेश कुमार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्रकाश देवतळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (निरंतर) मोहन पवार आदी उपस्थित होते. ना. वडेट्टीवार पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती जोपासावी. समाजाचे व्यापक हित लक्षात घेणारे संशोधन करावे. कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज असून यातून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा. नासामध्ये गेलेले भारतीय आपले संशोधन जगाला दाखवू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना विदेशी संस्थांची मदत घ्यावी लागते. देशपातळीवर आपले पेटंट व्हावी, आपल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली पाहिजे, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले. याशिवाय हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी उपक्रमाची विद्यार्थ्यांनी कशी गरज आहे, याबाबत मार्गदर्शन केले. आभार हु.नो. मस्के यांनी मानले. यावेळी मान्यवर, विद्यार्थी व पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.विजेत्या विद्यार्थ्याला ५१ हजारांचा पुरस्कारस्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना दिल्ली येथे मॉडेल सादर करण्याची संधी भेटणार आहे. जिल्ह्यात विद्यार्थी यशस्वी झाल्यास ५१ हजारांचा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. सैनिक शाळेच्या आरक्षणात ओबीसी विद्यार्थ्यांनाही प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी दिली. सैनिक विद्यालयातील हे नाविण्यपूर्ण विज्ञान प्रदर्शन २२ जानेवारी २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.चांदा ते बांदा योजना सुरूच राहणारचंद्र्रपूर व सिंधुदुर्ग या मागास जिल्ह्यांमध्ये परंपरागत उद्योग व कृषीवर आधारित जोडधंद्यांना चालना देऊन लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी तयार करण्यात आली. ही योजना यापुढेही सुरू राहणार आहे. योजना बंद करण्यात आल्याची अफवा असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नंदोरी येथील पशु प्रदर्शनच्या उद्घाटनानंतर सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. चांदा ते बांदा ही योजना बंद करण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. या योजनेतंर्गत चार वर्षांत जिल्ह्यात २०० दोनशे कोटींची कामे झाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक