शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दाखले हवे? आता फक्त QR कोड स्कॅन करा : पोंभूर्णा तहसीलचा नवा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:09 IST

पोंभुर्णा तहसीलदारांचा अभिनव उपक्रम : नागरिकांचे हेलपाटे होणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णाः तालुक्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयाला असणाऱ्या सुट्टया व वेळेवर अधिकारी कर्मचारी उपस्थित न राहणे, यामुळे कार्यालयात आल्यानंतर दाखल्यांसाठी हेलपाटे व अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणी कमी करण्यासाठी दाखले क्यूआर कोड उपक्रम या विशेष सुविधेचा तहसील कार्यालयाने ५ ऑगस्ट रोजी शुभारंभकेला आहे. या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आता कार्यालयीन वेळेनंतर व सुटीच्या दिवशी किंवा आपत्कालीन परिस्थितीतही आवश्यक दाखले क्यूआर कोडच्या माध्यमातून मागवता येणार आहेत.

काही वेळा अधिकारी, कर्मचारी दौऱ्यावर असतात. कार्यालय बंद असते किंवा सुटीमुळे काम होऊ शकत नाही. दाखले मिळतील, यासाठी नागरिक दूरवरून आलेले असतात. कार्यालयाची वेळ संपली असेल किंवा दुसऱ्या दिवशी दाखला नोकरी किंवा प्रवेशासाठी अत्यावश्यक असेल तर तहसील कार्यालयात असलेल्या क्यूआर कोडवर दाखल्याची पावती पाठवल्यास तहसील कार्यालयातून शक्य तितक्या लवकर काम कार्यालयीन वेळेनंतर किंवा पूर्ण सुटीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे नैसर्गिक आपत्ती, सलग सुट्टया अशा प्रसंगी कोणतेही नुकसान होणार नाही, नागरिकांना महसूल सेवा अधिक सुलभ, वेळेत उपलब्ध करून देणारा ठरेल, असा विश्वास तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी व्यक्त केला.

...हे दाखले मिळणारया उपक्रमाअंतर्गत उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, भूमिहीन दाखला, शेतकरी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच महसूल विभागामार्फत दिले जाणारे इतर सर्व प्रकारचे दाखले मिळणार आहेत. दाखले क्यूआर कोड उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार मोहनिश शेलवटकर, सामाजिक कार्यकर्ते जगन येलके, वनपरिक्षेत्र अधिकारी फणिंद्र गादेवार, नायब तहसीलदार रामकृष्ण उईके, दीपाली आत्राम, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके यांच्या हस्ते करण्यात आले.

"आपले व्हॉटसअॅप ओपन केल्यानंतर वरील बाजूस तीन टिंब दिसतात, त्यावर दाबल्याने मेनू ओपन होईल. सर्वात खाली सेटिंगमध्ये जा. वर उजव्या बाजूस क्यूआर कोड चिन्ह दिसते, त्यावर क्लिक करा. स्कॅन कोडवर क्लिक करा व त्यावरील फ्लेक्स तहसील कार्यालय, पोंभुर्णा क्यूआर कोड स्कॅन करा. त्यावर पावती पाठवावी."- मोहनिश शेलवटकर, तहसीलदार, पोंभुर्णा 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर