शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीच्या अमंलबजावणीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:32 IST

दारुबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री सुरु आहे. मात्र अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना जीव गमवावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दारुबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री सुरु आहे. मात्र अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे दारुबंदी रोखण्यासाठी कठोर अमंलबजावणीची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री संजय देवतळे यांनी केले.धनगर समाज संघटनेच्या वतीने नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, डॉ. विजय देवतळे, संजय बोधे, जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, धनगर समाजाचे तालुका अध्यक्ष प्राचार्य गजानन शेळके, तहसीलदार बोडखे, डॉ. कपिल टोंगे, मनिष जेठाणी, बंडू डाखरे, अ‍ॅड. जयंत ठाकरे, प्रा. पिसे, रुपलाल कावळे, पडवे, राजेंद्र मर्दाने आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विजय देवतळे म्हणाले, जिल्ह्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाकडे वळला असून आता गुन्हेगारी नवीन रूप घेत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी सबधित विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. तर अ‍ॅड. टेमुर्डे म्हणाले, सद्यास्थितीत कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे स्त्रियावरील अत्याचारातसुद्धा वाढ झाली आहे. अवैध दारुविक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.तर लक्ष्मण गमे म्हणाले, छत्रपती चिडे यांच्यावर गुन्हेगारांना पकडताना मरणाची वेळ येणे, ही अत्यंत दुर्देवी बाब असल्याचे सांगितले. तर गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते दारू तस्करांना रोखण्याचा यापुढे प्रयत्न करतील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य शेळके यांनी छत्रपती चिडे यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडत त्याचे स्मारक बांधण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन पंडीत लोंढे यांनी केले. यावेळी अनेकांची उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी