शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नवरगाव आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:02 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र येथे अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे.

ठळक मुद्देमंजूर पदे भरण्याची मागणी : विविध संवर्गातील १३ पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र येथे अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे.सिंदेवाही तालुक्यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालय तर यावरच जास्त भार पडू नये यासाठी प्राथमिक आरोग्य नवरगाव, गुंजेवाही, मोहाळी व प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा असे तालुक्यात चार विभाग करण्यात आले आहे. नवरगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत रत्नापूर, पेंढरी, मिनघरी, खातगाव, पळसगाव (जाट) असे उपकेंद्र जोडले आहेत. मात्र उपकेंद्रामध्ये विशेष सोयी व डॉक्टर नसल्याने त्या-त्या ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जात असतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येणाºया रुग्णांची संख्या दिवेसंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे.नवरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१ गावांचा समावेश असून ४०-५० हजार लोकसंख्या आहे. इतका भार या केंद्रावर असताना वैद्यकीय अधिकारी दोन पदे मंजूर असून एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. औषधी संयोजकाचे पद रिक्त आहे. परिचराची चार पदे मंजूर असून दोनच कार्यरत आहेत. आरोग्य सेवक पाच पदे मंजूर असताना तीन पदे रिक्त आहेत. आरोग्यसेविका व लिपीक ही पदेही रिक्त असून अशी १३ पदे रिक्त आहेत.नवरगाव हे तालुक्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत दुसºया क्रमांकाचे गाव आहे. शिवाय या केंद्राजवळ देलनवाडी धुमनखेडा, रत्नापूर, गिरगाव, आलेसूर, नैनपूर, नाचनभट्टी, मिनघरी, उमरवाही अशी विविध गावेही आहेत. एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने कधी सुट्टीवर असल्यास शिवाय वेळोवेळी तालुकास्तरावर जिल्हाभरावर आरोग्य विभागाच्या मिटिंग कार्यक्रम असतात. अशावेळी वैद्यकीय अधिकारी हजर राहू शकत नाही. तेव्हा रुग्ण उपचारासाठी तसेच महिला प्रसुतीसाठी किंवा एखादा रुग्ण इमर्जन्सी असल्यास तारांबळ उळते. अशावेळी दोन वैद्यकीय अधिकाºयांची गरज आहे.रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथील विविध रिक्त असलेली पदे आरोग्य विभागाने त्वरीत भरावी आणि या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.