लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उमरेड-नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. चिमूर तालुक्यातही चार महामार्गांना मंजुरी मिळाली आहे. मात्र नागभीड-सिंदेवाही हा अतिशय वर्दळीचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित होण्यापासून वंचित आहे. या मार्गालाही राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणी होत आहे.गेल्या काही वर्षात सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आणि रस्त्यांवर वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुने राज्यमार्ग वाहतुकीचा भार पेलण्यास आता असमर्थ ठरले आहेत. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. या बाबी लक्षात घेता केंद्र सरकारने अनेक राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.तर गडचिरोली- मूल-सिंदेवाही-नेरी-चिमूर या राज्य मार्गाचेही राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याला मंजुरी मिळाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीची ही नांदी असली याच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-सिंदेवाही हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे.या मार्गाने छत्तीसगडकडून आंध्रप्रदेशकडे जाणारी वाहनांची वाहतूक एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे की, वाहतुकीचा हा भार पेलण्यास हा मार्ग असमर्थ ठरत आहे. तेव्हा नागभीड-सिंदेवाही या मार्गाचेही राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.इतर मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जागडचिरोली-चंद्रपूर-नागपूर या तीन जिल्ह्यांची जीवन वाहिनी असा उल्लेख केला तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, अशा उमरेड-नागभीड-आरमोरी या राज्य मागार्चाही यात समावेश आहे. या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेऊन व त्वरित मंजुरी देवून या मार्गाचे कामही सुरू करण्यात आले आहे. या सोबतच चिमूर तालुक्यातील आणि चिमूरला जोडणाऱ्या चारही राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार असून त्यांना मंजुरीही मिळाली आहे.
नागभीड-सिंदेवाही मार्गालाही हवा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:35 IST
लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उमरेड-नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. चिमूर तालुक्यातही चार महामार्गांना मंजुरी मिळाली आहे. मात्र नागभीड-सिंदेवाही हा अतिशय वर्दळीचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित होण्यापासून वंचित आहे. या मार्गालाही राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणी होत आहे.गेल्या काही वर्षात सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती ...
नागभीड-सिंदेवाही मार्गालाही हवा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा
ठळक मुद्देनागरिकांची मागणी : विकासाला मिळणार चालना