शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राष्ट्रीय महामार्ग ठरला डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:05 IST

उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी मार्गच वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देवाट काढणेही कठीण : कासवगतीचे चौपदरीकरण ठरतेय अडचणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी मार्गच वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.उन्हाळ्याच्या काळात मार्गावरून सर्वत्र उडण्याऱ्या धुराची समस्या होती. आता पावसाळ्यात चिखलामुळे वाहनचालकांना वाट शोधणेच कठीण झालेले आहे.महामार्गाच्या एका बाजूस गिट्टी पसरवली आहे. मात्र त्यावर प्रेसिंग करण्यात आलेली नाही. परिणामी ती गिट्टी सर्वत्र विखुरली आहे. तर दुसरी बाजू वाहनांसाठी चालू आहे. या पर्यायी मार्गाच्या तुलनेत काम सुरू असलेला मार्ग खूपच उंच आहे. थोडासाही पाऊस आला तर पर्यायी मार्गावर पाणी साचते व या पाण्याचा निचरा होत नाही.यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण होत आहे. आणि या चिखलातून वाट काढणे वाहन चालकांसाठी कठीण ठरत आहे.दुचाकीने प्रवास करणे तर कसरत केल्यासारखेच झाले आहे. प्रवासादरम्यान चारचाकी वाहन बाजूने गेले तर साचलेले सर्व चिखलाच पाणी दुचाकी चालकांच्या अंगावर उडत असते. अशा चिखलयुक्त मार्गावर वाहन स्लिप होणे, रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, असे प्रकार दररोज घडत आहेत. याच बाजूने प्रवास करताना सावध प्रवास करावा लागत आहे.जर बाजूने मोठे वाहन वेगाने गेल्यास पसरलेली गिट्टी उसळून लागण्याची शक्यता दाट शक्यता आहे. अशावेळी वाहनचालक गंभीर जखमी होऊ शकतो. यासारख्या अनेक समस्या या मार्गावर उद्भवत आहेत. अलिकडच्या काळात बेंबाळ गावाजवळ पावसामुळे चक्क रस्ता वाहून गेला.परिणामी एक दिवस पूर्ण महामार्गाच बंद करण्यात आला होता. या महामार्गाच्या चौपदरीकरणाची गती अतिशय मंद स्वरूपाची आहे. त्यामुळे आणखी किती काळ असा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागेल हे सांगणे कठीण आहे.विशेष म्हणजे, याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात जडवाहनांचीही वाहतूक होते. या मार्गावर वाहने रस्त्यात साचलेल्या चिखलामुळे अडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पर्यायी मार्ग दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.