शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील बंदी करताहेत राष्ट्रध्वजाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:13 IST

येथील जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून अनेक बंदीबांधव निष्णात कारागीर झाले आहेत. बांबूपासून विविध वस्तू ते तयार करीत असून त्यांनी तयार केलेले राष्ट्रध्वज हस्तकलेचे उत्तम आकर्षण ठरत आहे.

ठळक मुद्देजिल्हा कारागृहाचा स्तुत्य उपक्रम : शिक्षा भोेगणाऱ्यांनाही रोजगाराची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून अनेक बंदीबांधव निष्णात कारागीर झाले आहेत. बांबूपासून विविध वस्तू ते तयार करीत असून त्यांनी तयार केलेले राष्ट्रध्वज हस्तकलेचे उत्तम आकर्षण ठरत आहे.कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या परवानगीने बंदी बांधवांसाठी येथील जिल्हा कारागृहात बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांच्या अध्यक्षतेखाली व बांबू संशोधन केंद्राचे संचालक राहुल पाटील, हॅन्डीक्राफ्ट सुपरवायजर योगिता साठवणे, हॅन्डीक्राफ्ट सुपरवायजर किशोर गायकवाड व सुरेश चुग, अकबर शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीकडून बंदीबांधवांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. कारागृहातून मुक्त झाल्यावर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोनातून बांबूपासून निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्तु बनविण्याचे त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यातून प्रशिक्षित झालेल्या १७ पुरूष कैदीबांधव व १० महिला हे कारागृहात बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तु तयार करीत आहे. कारागृह प्रशासनाच्या वतीने व बीआरटीसीच्या वतीने बंदीवानांनी बांबूपासून तयार केलेले राष्ट्रध्वज हे अत्यंत लक्षवेधी ठरत आहे.बांबूपासून तयार होणाऱ्या या हस्तकलेच्या विविध वस्तूंमधून बंदीवानांना कारागृहात रोजगार प्राप्त झाले असून कारागृहात शिक्षा भोगून सुटल्यानंतर ते स्वत:चा उदरनिर्वाह करू शकेल, एवढे कौशल्य त्यांनी या बांबू प्रशिक्षणातून हस्तगत केलेले आहे. बंदी पुनर्वसनाच्या दृष्टीने कारागृह प्रशासन व बीआरटीसी यांनी घेतलेले हे सकारात्मक पाऊल असून बंदीवानांनी या उपक्रमाचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आहे. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांच्या नेतृत्वात वरिष्ठ तुरूंगाधिकारी वैभव आत्राम, तुरूंगाधिकारी विठ्ठल पवार, सुभेदार, अशोक मोटघरे, देवाजी फलके, शिपाई गौरव पाचाडे, रिकू गौर, पदमाकर मेश्राम, लवकुश चव्हाण, नितीन खोब्रागडे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :jailतुरुंगNational Flagराष्ट्रध्वज