मोहाळी (नलेश्वर) : सिंदेवाही तालुक्यातील चारगाव (कुकडहेटी) येथील आनंदराव सुकरू श्रीरामे व नातेवाईक यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारावरुन कोणत्याही प्रकारची वाटणी व संमतीपत्र न घेता इतर हिस्सेदाराच्या नावे पूर्ण शेतजमीन करून हक्क असलेल्या हिस्सेदारांची नावे सातबारावर पूर्णपणे बेपत्ता केल्याचा प्रताप तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केला आहे. कुकडहेटी पटवारी हलका क्रमांक १० येथील जुना गट नं. ५१२, आराजी २.६४ हेक्टर आर. धानाची शेतजमीन अर्जदार व गैरअर्जदार यांची वडिलोपार्जित सामाईक शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीच्या सातबारावर २१ लोकांची नावे आहेत. संबंधित शेतकरी परस्परांचे नातेवाईक व हिस्सेदार आहेत. अन्यायग्रस्त आनंदराव सुकरू श्रीरामे, जनार्दन श्रीरामे, मुरर्लीधर श्रीरामे, मारोती श्रीरामे, भुजंग श्रीरामे, शेवंता श्रीरामे, सुखदेव श्रीरामे यांना २.६४ हेक्टर आर. जमिनीपैकी १.७६ हेक्टर आर. शेतजमीन हवी आहे तर उर्वरित हिस्सेदारांना ०.८८ हेक्टर आर. शेतजमीन हवी होती. परंतु तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनीकोणत्याही प्रकारचे वाटणी अथवा संमतीपत्र न घेता भुपेन्द्र श्रीरामे, संतोष श्रीरामे, अनु श्रीरामे, तारा श्रीरामे यांचे नाव ०.४४ हेक्टर आर., तुळशीराम रामजी श्रीरामे यांचे ०.४४ हेक्टर आर., सुरेश परसराम श्रीरामे, देविदास श्रीरामे यांचे नावे ०.४४ हेक्टर आर. नामदेव रामाजी श्रीरामे यांचे नावे ०.४४ हेक्टर आर, महादेव रामजी श्रीरामे यांचे नावे ०.४४ हेक्टर आर, राजेश्वर रामजी श्रीरामे यांचे नावे ०.४४ हेक्टर आर. शेतजमिनीचे सहा सातबारा तयार करून २.६४ हेक्टर आर. शेतजमिनीची परस्पर विल्हेवाट लावताना शेतकऱ्यांची नावे सातबारावरुन गायब करण्यात आली. (वार्ताहर)
सातबारावरुन नावे केली गायब
By admin | Updated: April 29, 2015 01:20 IST