शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

विकासाच्या 'समृद्धी'ची नागभीडला हुलकावणी

By घनशाम नवाथे | Updated: May 17, 2024 14:29 IST

नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे संताप : समृध्दी मार्ग नागभीडमार्गेच हवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : प्रस्तावित समृद्धी महामार्गाने नागभीडला हुलकावणी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात या महामार्गाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर या समृद्धी महामार्गावरून नागभीडच्या सोशल मीडियावर नाराजीचे सूर व्यक्त होत आहेत... चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना मध्यवर्ती असलेले नागभीड समृद्धीपासून वंचित राहिल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रस्तावित समृद्धी महामार्ग नागपूर गोंदिया, नागपूर गडचिरोली आणि वर्धा चंद्रपूर, पोंभूर्णा या मार्गाने जाणार असल्याची माहिती आहे. मात्र नागपूरवरून लाखांदूर आरमोरी मार्गे गडचिरोलीला जाणारा हा समृद्धी महामार्ग केवळ शोभेचा आणि पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर, भंडारा, लाखांदूर, गडचिरोली ऐवजी वर्धा सेलडोह-गिरड- भीशी नागभीड- ब्रम्हपुरी आरमोरी गडचिरोली अशी समृद्धी महामार्गाची दिशा दिल्यास तो लोकांच्या अधिक सोयीचा होऊ शकतो. असा दावा केला जात आहे. अगोदरच आरमोरी नागभीड- उमरेड नागपूर हा ३५३ डी राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध असल्यावर समृद्धी महामार्गाने नागपूरसाठी भंडारा मार्गे कोण कशाला प्रवास करतील, अशी शंकाही यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. समृद्धीवर नागपूर किंवा वर्धेहून चढणे हे केव्हाही वेळ, सोय व अंतराच्या दृष्टीने नागभीडमार्गेच असायला पाहिजे, अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.

तर रोजगारही मिळाला असताअगोदरच विकासापासून कोसो दूर असलेल्या नागभीड येथून समृद्धी महामार्ग गेला असता तर नागभीड तालुक्यात या समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने छोट्या मोठ्या व्यवसायाचे दरवाजे उघडले असते आणि येथील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य माणूस व्यक्त करीत आहेत.

जरी निविदा प्रसिद्ध झाल्या असल्या तरी महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर करून या प्रस्तावित समृद्धी महामार्गाचा फेरविचार करावा. समृद्धी महामार्ग नागभीड मार्गे वर्धा सोयीचा राहील. गडचिरोली - भंडारा समृद्धी मार्ग म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असा राहणार आहे.- संजय गजपुरे, माजी जि.प. सदस्य, नागभीड 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गchandrapur-acचंद्रपूर