Nagar Panchayat Election Result 2022: चंद्रपुर जिल्ह्यात पाच नगरपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 02:01 PM2022-01-19T14:01:59+5:302022-01-19T14:09:42+5:30

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने पाच नगरपंचायतींवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले.

Nagar Panchayat Election Result 2022: Congress dominates five Nagar Panchayats in Chandrapur district | Nagar Panchayat Election Result 2022: चंद्रपुर जिल्ह्यात पाच नगरपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व

Nagar Panchayat Election Result 2022: चंद्रपुर जिल्ह्यात पाच नगरपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व

googlenewsNext

चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने पाच नगरपंचायतींवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले. तर भाजपला पोंभुर्णा या एकाच नगरपंचायतीवर विजय मिळविता आला.

सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गाेंडपिपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीच्या एकूण १०२ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक ५३ जागा मिळाला तर भाजपला २४ जागांवरच थांबावे लागले. राष्ट्रवादी कॉग्रेसला ८, शिवसेना ४, अपक्ष ३ आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागा व शेतकरी संघटना तसेेच बहुजन वंचित आघाडीला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे.

पक्षीय बलाबल
१. सिंदेवाही : काँग्रेस -१३, भाजप ३, अपक्ष १

२. सावली : काँग्रेस -१४, भाजप -३

३. पोंभुर्णा : भाजप -१०, शिवसेना ४, वंचित २, काँग्रेस १

४. गोंडपिपरी : काँग्रेस ७, भाजप ४ शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस २, अपक्ष २

५. कोरपना : काँगेस १२, भाजप ४, शेतकरी संघटना १

६. जिवती : काँग्रेस ६, राष्ट्रवादी काँग्रेस ६, गोंगपा ५

Web Title: Nagar Panchayat Election Result 2022: Congress dominates five Nagar Panchayats in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.