शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलाचा खून; दोन दिवसांतील हत्येची चौथी घटना, जिल्ह्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 11:55 IST

आठ तासांमध्ये आरोपींना अटक

चंद्रपूर : प्रेम प्रकरणातून दोघांनी एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना पडोली पोलिस स्टेशन हद्दीत घडली. छोटा नागपूर रोड पाइपलाइनजवळील पटेल वीटभट्टीच्या मागील बाजूला शुक्रवारी खून करून मृतदेह राखेमध्ये दाबून ठेवण्यात आला होता. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून अवघ्या आठ तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींमध्ये एक अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.

मृत अल्पवयीन मुलगा ज्या मुलीवर प्रेम करत होता. त्याच मुलीवर आरोपीसुद्धा प्रेम करीत होते. आरोपीने त्याचा काटा काढण्यासाठी समझोता करण्याच्या बहाण्याने छोटा नागपूर परिसरात बोलावले. त्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणामध्ये आरोपींनी नेहरू नगर परिसरातील अल्पवयीन मुलाची शुक्रवारी हत्या केली. त्यानंतर मृतदेहावर परिसरात असलेली राख टाकून आरोपी पळून गेले. रविवारी परिसरात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विविध पथके तयार करून रवाना केली होती.

घटनास्थळाची बारकाईने तपासणी करून तपासाला गती देण्यात आली. गोपनीय माहिती काढून प्रथम मृताची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक मडावी, पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलिस हवालदार संजय आतकुलवार, नापोशि संतोष येलपुलवार, गजानन नागरे, निरीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, रवींद्र पंधरे, प्रांजल झिलपे, नरेश डाहुले आदींनी केली. मागील दोन दिवसांमध्ये ही हत्येची चौथी घटना घटल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर