प्रवीण खिरटकर
वरोरा : शहरातील ओमनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या खुल्या जागेवर नगर परिषदेतर्फे पोलीस व नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेले संरक्षण भिंतीचे बांधकाम या गृहनिर्माण संस्थेच्या मागे राहत असलेल्या नागरिकांनी अर्ध्या तासातच जमीनदोस्त केले. या घटनेने या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषदेच्या आदेशाने होणारे बांधकाम या नागरिकांनी यापूर्वीही तीनदा पाडले होते.
येथील शिवाजी वॉर्डात काही वर्षांपूर्वी ओमनगर गृहनिर्माण संस्थेने जमीन खरेदी करून लेआऊट टाकला. या लेआऊटमधील भूखंड संस्थेने आपल्या सभासदांना वितरित केल्यानंतर सभासदांनी घरे बांधली व ते तेथे राहत आहेत. संस्थेच्या खुल्या जागेला नगर परिषदेने संरक्षण भिंत बांधली, तेव्हा इतरांनी कोणताही आक्षेप घेतला नाही.
शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या या घटनेची नगर परिषद प्रशासनाला माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गुरुवारी नगर परिषद प्रशासनाने पोलीस व नगर परिषदेचे अभियंता यांच्या उपस्थितीत या भिंतीचे बांधकाम चवथ्यांदा पूर्ण केले. हे बांधकाम गुरुवारी दुपारी २ वाजता पूर्ण झाले. हे बांधकाम सुरू असताना या भागातील महिला, पुरुष व युवक घटनास्थळी आले व त्यांनी पोलीस, अभियंता यांच्याशी वाद घातला. त्यानंतर पोलीस, अभियंता व ठेकेदार घटनास्थळावरून निघून गेले. हे सर्व जण निघून जाताच दुपारी २.३० वाजताच्या सुमारास या नागरिकांनी भिंत व त्याला लावलेली लोखंडी जाळी तोडून टाकली.
बॉक्स
यापूूर्वीची अनेक तोडले बांधकाम
नगर परिषदेने यावर्षी शहरातील सर्व लेआऊटमधील खुल्या जागेच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले आहे. यानुसार ओमनगरमधील खुल्या जागेचेही काम सुरू झाले असता संस्थेच्या मागील भागात राहणाऱ्या नागरिकांनी या जागेला त्यांच्या बाजूने दार देण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली. तेव्हा ओमनगर गृहनिर्माण संस्थेने आक्षेप घेऊन आपली बाजू नगर परिषदेसमोर मांडली असता नगर परिषद प्रशासनाने संस्थेची बाजू न ऐकता संरक्षण भिंतीचे काम सुरूच ठेवले. यामुळे चिडून या नागरिकांनी १८ जुलैला ठेकेदाराच्या समक्षच भिंतीचे बांधकाम तोडून टाकले. यानंतर नगर परिषदेने पुन्हा दोनदा या भिंतीचे बांधकाम केले असता या नागरिकांनी ११ ऑगस्ट व त्यानंतर ५ सप्टेंबरला हे बांधकाम पुन्हा तोडून टाकले.
100921\img_20210910_111423.jpg
warora