शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

स्मार्टफोन नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मनपा शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

कोरोना टाळेबंदी ३१ जुलैपर्यंत असल्याने शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये अगदी पहिल्या दिवसांपासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र जिल्हा परिषद व महानगर पालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात.

ठळक मुद्देअभिनव उपक्रम : दररोज दहा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे मुलांचेशिक्षण नुकसान होवू नये, यासाठी चंद्रपूर महानगर पालिका शाळेच्या शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विद्यार्थ्यांच्या घरी जावून अध्यापन करण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम सात दिवसांपासून सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश शाळा ऑनलाईन शिक्षण देत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्मार्टफोन उपलब्ध नसणाºया पालकांसाठी हा उपक्रम आत्मविश्वास वाढविणारा ठरला आहे.कोरोना टाळेबंदी ३१ जुलैपर्यंत असल्याने शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये अगदी पहिल्या दिवसांपासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र जिल्हा परिषद व महानगर पालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात.त्यामुळे त्यांच्याकडे स्मार्टफोन नसतो, यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे कठीण आहे. मात्र महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, प्रशासकीय अधिकारी (शिक्षण) नागेश नीत यांनी कल्पकता वापरून ‘शाळा बंद शिक्षण’ सुरू हा उपक्रम सुरु केला आहे. सध्या पालक व विद्यार्थ्यांचाही शाळा बंद ठेवण्याचा आग्रह आहे. मात्र शिक्षण सुरू ठेवायचे आहे.महानगर पालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षतात. १० टक्के विद्यार्थ्यांकडेच मोबाईल आहे. त्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.महानगर पालिका अंतर्गत शहरात पहिली ते दहावी पर्यंतच्या २९ शाळा आहेत. त्यामध्ये २ हजार ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये ७४ शिक्षक कार्यरत आहेत. सर्व ७४ शिक्षकांनी दररोज दहा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षणाचे धडे देण्यासाठी नियोजन केले.याबाबत आयुक्त राजेश मोहिते यांच्या सूचनांचे पालन करण्यात आले. एखाद्या प्रभागात जर आठ ते दहा विद्यार्थी जवळ राहात असतील तर त्यांना एकत्र एकाच घरी आणून तिथेच वर्ग घेणे सुरू केले आहे. आठवडाभरापासून हा उपक्रम महापालिकेच्या सर्व शाळा राबवित आहेत. दहा विद्यार्थ्यांचा ४५ मिनिट वर्ग घ्यायचा आहे. त्यानंतर दुसºया दिवशी दुसरे दहा विद्यार्थी असा क्रम ठरविण्यात आला. हा वर्ग घेताना विद्यार्थ्यांना घरी अभ्यासक करण्यासाठी गृहपाठ तथा इरत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सूचना द्यायची विशेष म्हणजे या उपक्रमाला विद्यार्थी व पालक यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी व शिक्षक मास्क लावून सॅनिटायझरने हात स्वच्छ करून शिक्षण घेत आहेत. प्रशासकीय अधिकारी अतिशय सुरेख पद्धतीने घरोघरी शिक्षक वर्ग घेत आहेत.प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून पुस्तके मोफत घरपोच देण्यात आली. या उपक्रमामुळे शहरातील सर्वसामान्य पालकांनी समाधान व्यक्त केले. शिक्षक पालकांच्या सूचनांची नोंद घेत आहेत.शाळा बंद मात्र शिक्षण सुरूकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून जिल्ह्यात काही शाळा सुरू झाल्या आहेत. इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट शाळांनीही ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या चांगल्या श्रेणीतील आहेत. उद्योग,व्यवसाय व नोकरदार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने अशा पालकांना स्मार्टफोनची समस्याच नाही.मात्र, गोरगरीब कुटुंबातील पालकांना उदरनिर्वाहासाठीच मोठा संघर्ष करावा लागतो. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांचा रोजगार बुडाला. मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलने कदापि झेपत नाही. कुटुंबाला शिक्षणाची पार्श्वभूमी असेलच याचीही खात्री नाही. अशा विषम सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीत चंद्रपूर महानगर पालिकेने विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा बंद शिक्षण’ उपक्रम अंतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वर्ग घेत शिक्षणाचे धडे देणे सुुरू केले आहे.कोरोनामुळे शिक्षणाच्या पारंपरिक संकल्पनांचा नव्याने विचार करण्याची वेळ आणली. शाळा सुरूच करता येत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय, हा प्रश्न सर्व शिक्षकांना सतावत होता. त्यामुळे यावर खूप चर्चा करण्यात आली. आयुक्त राजेश मोहिते यांनी ’शाळा बंद शिक्षण सुरू’ या उपक्रमाला भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे शक्य झाले.- नागेश नित, प्रशासकीय अधिकारी शिक्षण, मनपा,चंद्रपूर

टॅग्स :Schoolशाळा