शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मनपाचा ४०२ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:57 IST

२०१८-१९ या वर्षासाठी मनपाचा ४०२ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्त संजय काकडे यांनी स्थायी समितीला मंगळवारी सादर केला. यात २०.३५ कोटींच्या अतिरीक्त नाविण्यपूर्ण कामांची शिफारस करून स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली.

ठळक मुद्देविरोधकांचा आक्षेप : स्थायी समितीकडून २०.३५ कोटींच्या कामांची शिफारस

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : २०१८-१९ या वर्षासाठी मनपाचा ४०२ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्त संजय काकडे यांनी स्थायी समितीला मंगळवारी सादर केला. यात २०.३५ कोटींच्या अतिरीक्त नाविण्यपूर्ण कामांची शिफारस करून स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली. हा अर्थसंकल्प मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार असला तरी याला विरोधकांनी आक्षेप नोंदविला आहे.आयुक्त काकडे यांनी सादर केलेल्या ४०२ कोटींच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची मनपाची बचत दाखविण्यात आली आहे. तर संपती करासहीत अन्य कराच्या माध्यमातून ५८.२३ कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित असून २३९ कोटी रूपये सरकारकडून अनुदान स्वरूपात अपेक्षित असल्याची माहिती मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, सभागृह नेता वसंता देशमुख, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, उपायुक्त विजय देवळीकर, मुख्य वित्त अधिकारी गजानन बोखडे आदी उपस्थित होते.माहिती देताना राहुल पावडे म्हणाले, मनपा अर्थसंकल्पात पालकमंत्री प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºयांना मदत केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महिला व पुरूषांसाठी अत्याधुनिक पद्धतीचे शौचालय बांधकाम करण्यात येणार असून यासाठी ३० लाख रुपये तर पालकमंत्री धनलक्ष्मी योजने अंतर्गत ‘सब पढे, सब बढे’, ‘स्कूल चले हम’ मिशन, पालकमंत्री शुध्द पेयजल व शिष्यवृत्ती योजनेसाठी ५० लाखांची तरतूद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महिला बचत गटांसाठी रोजगार संमेलन व मंच स्थापित करण्यासाठी ३० लाख, कर्मचाºयांच्या प्रशिक्षणासाठी १० लाख, शहरातील मटन, मच्छी, चिकन मार्केटच्या विकासासाठी १ कोटी, कांजी हाऊससाठी ५० लाख, महत्त्वपूर्ण मोठे पूल बांधण्यासाठी १ कोटी, आरोग्य केंद्राच्या विकासासाठी १ कोटी, मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना प्रशिक्षण अभ्यास दौºयासाठी ३० लाख, मनपा झोन कार्यालयाच्या अत्याधुनिकीकरणासाठी ५० लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात असल्याची माहिती सभापती पावडे यांनी दिली.ऐतिहासिक संग्रहालय उभारणीसाठी २० लाख, स्वर्गरथ वाहनाच्या खरेदीसाठी १५ लाख, सराई मार्केट विकासासाठी ७ कोटी, मनपा कामकाजाची माहिती पुस्तिका छपाईसाठी ५ लाख, महापुरूषांच्या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ३० लाख, मनपाच्या योजनांचा प्रचार, प्रसारासाठी ३० लाख, मनपा क्षेत्रात सामाजिक कार्य करणाºया नागरिकांना सन्मानित करण्यासाठी १० लाख, समाज प्रबोधन संमेलनासाठी १० लाख, स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यासाठी १० लाख, विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन वितरीत करण्यासाठी १० लाख, कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी १० लाख, महिलांनी सुचविलेल्या नाविन्यपूर्ण कामाकरिता ५० लाख, महापौर, सभापती जनता दरबार कार्यक्रमासाठी ५ लाख, दिव्यांगाचे विवाह संमेलन आयोजनासाठी ३० लाख तसेच शहरातील चार चौकांचे सौंदर्यीकरणासाठी ७० लाख रूपये अशा २०.३५ कोटींच्या कामांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याचे सभापती पावडे यांनी सांगितले.पदाधिकाऱ्यांनाही खर्चासाठी तरतूदअर्थसंकल्पात महापौर, सभापती यांच्या आकस्मिक खर्चासाठी ५० लाख, मनपा पदाधिकारी आकस्मिक खर्चासाठी १० लाख, मनपा आपत्कालीन खर्चासाठी १० लाख, महापौर, सभापती सहायता कल्याण निधीसाठी १० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला असता, राहुल पावडे यांनी आपत्कालीन खर्च गरजूंना मदतीसाठी ठेवण्यात आला आहे. अनेकदा मदतीची इच्छा असतानाही आर्थिक तरतूद नसते, असे सांगितले.महिलांना कराटे व ड्रायव्हिंग प्रशिक्षणमहापौर तेजस्वी अभियानासाठी ५० लाख रुपयांची शिफारस स्थायी समितीने केली आहे. या निधीतून शहरातील युवती व महिलांना आत्मरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण तसेच ड्रायव्हींग प्रशिक्षण देण्यात येणार आहे.महापौर तक्रार निवारण केंद्राची उभारणीमनपा अर्थसंकल्पात महापौर तक्रार निवारण केंद्रासाठी २५ लाखांची शिफारस करण्यात आली आहे. या केंद्रात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्या लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचा लवकर निपटारा होण्यास मदत होईल, असे पावडे यांनी म्हटले.कोणत्याही नगरसेवकांच्या सूचना, दुरूस्ती ऐकून न घेता आयुक्तांनी स्थायी समितीत बजेट सादर केला. राष्ट्रीय लेखा संहिता पद्धतीने बजेट सादर होणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बजेटमध्ये अनेक चुका व घोळ असून यावर आपला आक्षेप आहे.- नंदू नागरकर, नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती.