लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छता अभियानामध्ये राज्यातच नाही तर देशात अव्वल स्थानी येण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विविध प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात शहराची स्वच्छता केली जात आहे. तरीही नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता स्वच्छता अॅपद्वारे तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पथकांचे गठण करण्यात आले असून पथकाद्वारे वार्डावार्डात फिरून माहिती देण्यात येत आहे.सध्या देशात स्वच्छतेसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. केंद्र शासनातर्फे स्वच्छता अभियानासंदर्भात विविध पुरस्कारही देण्यात येते. यासाठी महापालिकांसह नगरपरिषदाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असून प्रथम क्रमांकासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. जिल्ह्यातून भद्रावती नगरपरिषदेने पुरस्कार पटकाविल्यानंतर इतर नगरपरिषदा आणि चंद्रपूर महानगरपालिकेनेही आता स्वच्छता मोहीम अधिक व्यापक राबविण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, स्वच्छता अॅपद्वारे तक्रार केल्यास २४ तासामध्ये स्वच्छता करण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र अॅपद्वारे तक्रार करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने आणि शासनाचा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी स्वच्छता अॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोजली जात असल्यामुळे आता मनपाने त्यादृष्टीने प्रयत्न करणे सुरु केले आहे. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करवून घेतले जात आहे.नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचास्वच्छता अॅपचा वापर करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. अॅपद्वारे कचºयासंदर्भात तक्रार केल्यास २४ तासाच्या आत संबंधित कर्मचारी तो कचरा उचलणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्वच्छता अॅपचा वापर करणे गरजेचे आहे.
स्वच्छता अॅपचा प्रसार करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:11 IST
सध्या देशात स्वच्छतेसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. केंद्र शासनातर्फे स्वच्छता अभियानासंदर्भात विविध पुरस्कारही देण्यात येते. यासाठी महापालिकांसह नगरपरिषदाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असून प्रथम क्रमांकासाठी चढाओढ निर्माण झाली आहे.
स्वच्छता अॅपचा प्रसार करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे जनजागृती
ठळक मुद्देपथकांद्वारे वार्डावार्डात प्रचार : नागरिकांच्या संपर्क क्रमांकाची नोंद