गर्दीच्या ठिकाणांवर मनपा प्रशासनाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:16 IST2021-02-19T04:16:44+5:302021-02-19T04:16:44+5:30

संभाव्य गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालये, लॉन, सभागृह, बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी आरोग्यविषयक नियमांचे पालन होते किंवा नाही, यावर मनपा ...

Municipal administration's eye on crowded places | गर्दीच्या ठिकाणांवर मनपा प्रशासनाची नजर

गर्दीच्या ठिकाणांवर मनपा प्रशासनाची नजर

संभाव्य गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालये, लॉन, सभागृह, बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी आरोग्यविषयक नियमांचे पालन होते किंवा नाही, यावर मनपा प्रशासनाने गुरुवारवापासून नजर ठेवत आहे. मास्क न घालणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत मास्कची दंडात्मक सुरू झाली. गुरुवारपासून मनपाने ऑटोद्वारे शहरात जागृती सुरू केली आहे, अशी माहिती महापौर कंचर्लावार यांनी दिली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन औरंगाबाद, अकोला, वाशिम, बुलढाणा व जालना शहरात जमावबंदीचे आदेश लागू झाले. ही स्थिती चंद्रपुरात शहरात येऊ नये यासाठी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे. नियमांचे पालन न केल्यास कोरोना संक्रमण वाढू शकते, त्यामुळे घराबाहेर निघताना मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. कुणाच्या संपर्कात आल्यास, ताप, सर्दी, कोरडा खोकला येत असेल तर नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

Web Title: Municipal administration's eye on crowded places