शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर मधून मुनगंटीवार तर चिमूरमधून भांगडिया यांना भाजपची उमेदवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:15 IST

चार विधानसभेतील उमेदवार गुलदस्त्यात : विद्यमान आमदारांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाने रविवारी राज्यातील ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये बल्लारपूरविधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारपूर, तर चिमूर विधानसभा क्षेत्रातून बंटी भांगडिया यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. दरम्यान, अन्य चार विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यातच आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहे. यामध्ये बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून यावेळीसुद्धा सुधीर मुनगंटीवार हेच निवडणूक लढवतील हे जवळपास यापूर्वीच निश्चित झाले होते. केवळ नावाची औपचारिकता बाकी होती. रविवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दोघांचेही नाव जाहीर होताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात आनंद व्यक्त केला. 

नवीन चेहऱ्यांना संधी जिल्ह्यात ज्या ठिकाणी भाजपचे विधानसभा सदस्य नाही, त्या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे या ठिकाणी निश्चितच भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यात भाजपकडून चार नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार की, काही जागा महायुतीच्या वाट्याला जाणार याबाबत आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वरोरा, ब्रह्मपुरीबाबत संभ्रम कायम २०१९ मध्ये ब्रह्मपुरी विधानसभेची जागा शिवसेनेने लढविली होती. त्यामुळे यावेळी शिंदेसेनेकडे ही जागा जाते की, भाजप दावा करतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे वरोरा विधानसभा क्षेत्र शिंदेसेनेकडे गेल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांना मिळताच तीन दिवसांपूर्वी भाजपच्या नागपूर येथील कार्यालयावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धडक देत कोणत्याही स्थितीत ही जागा शिंदेसेनेला देऊ नये, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे या जागेवरून राजकारण तापले आहे.

"पार्टीने संधी दिली आहे. महायुतीत महाराष्ट्राची प्रगती आणि स्थीर सरकारचा संदेश पोहोचविण्याचे काम निश्चितपणे आपण करणार आहोत. सर्वसामान्यांचा विकास करण्याचा आपला सातत्याने प्रयत्न आहे." - सुधीर मुनगंटीवार

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchimur-acचिमूरballarpur-acबल्लारपूरchandrapur-acचंद्रपूर