शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

'महागाईची साडेसाती म्हणजे भाजप' खासदार बाळू धानोरकर यांची खोचक टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 16:30 IST

शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. गॅसचे वाढते दर माता-बहिणींच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. मोदी सरकारची ही साडेसात वर्षे जणू महागाईची साडेसातीच असल्याची टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

ठळक मुद्देगोंडपिपरी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

चंद्रपूर : मोदी सरकारची ही साडेसात वर्षे जणू महागाईची साडेसातीच असल्याची खोचक टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली. ते गोंडपिपरी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

या सात वर्षात देशातील शेतकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, महिला वर्गासह सर्वच घटक असमाधानी असल्याचे दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून देशात सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. गॅसचे वाढते दर माता-बहिणींच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. मोदी सरकारची ही साडेसात वर्षे जणू महागाईची साडेसातीच असल्याचे धानोरकर यावेळी बोलताना म्हणाले.

आमदार, खासदार, पालकमंत्री, राज्यात आपली पूर्ण सत्ता आहे. त्यामुळे, आता या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पूर्ण ताकतीने पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद यामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकायला हवा, त्यासाठी सर्वांनी मिळून कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन धानोरकर यांनी यावेळी केले.

याप्रसंगी बोलताना आमदार आमदार सुभाष धोटे यांनी देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले. सामान्य नागरिकांना आता काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. यादृष्टीने गावा-गावात काँग्रेस विचारधारा पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहनही आमदार धोटे यांनी केले.

गोंडपिपरी तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, युवा काँग्रेस, सेवा दल, अनुसूचित दलच्यावतीने स्थानिक कन्यका सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यात शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकेश वानोडे, शिवसेनेचे हरमेल डांगीजी यांच्यासह शेकडो युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी, यावेळी आमदार सुभाष धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :SocialसामाजिकPoliticsराजकारण