चंद्रपूर : विविध प्रलंबीत मागण्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकारी शिखर संघटने (मॅग्मो) च्यावतीने १ जुलैपासून सुरू केलेले असहकार काम बंद आंदोलन गुरूवारी चौथ्याही दिवशी सुरूच होते. या आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे.आंदोलनाचे विपरीत परिणाम लक्षात घेता, शासनाने मॅग्मो संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण केले. परंतु अखेरच्या क्षणी चर्चा फिस्कटली. हे आंदोलन संंपूर्ण राज्यभर सुरू असून या आंदोलनादरम्यान शासनाने दडपशाहीची भूमिका अवलंबिले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.आंदोलनामुळे आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. गुरूवारी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकही रुग्ण नव्हता. आंदोलनामुळे शवविच्छेदन, शल्यचिकीत्सा, प्रसुती शस्त्रक्रीया व अन्य महत्वाच्या आरोग्य सेवांवर परिणाम झाला असून रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टरांचे आंदोलन चौथ्याही दिवशी सुरूच
By admin | Updated: July 3, 2014 23:29 IST