शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटातील आमदाराच्या मातोश्री विकतायंत 'टोपलं, सूप-दुर्डी'; म्हणे गावच्या यात्रेत होते जादा विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 15:12 IST

चंद्रपूर शहरात सध्या माता महाकालीची यात्रा सुरु आहे. या यात्रेत एक  रस्त्याच्या कडेला बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आजीबाईंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

चंद्रपूर - राजकारणी, आमदार, खासदार म्हटलं की घरी-दारी सुबत्ता. पैसा-अडका आणि घरी उद्योगधंदे असाच समज सध्याच्या काळात बनलाय. कारण, आजकाल नगरसेवकही कोट्यवधींचे मालक असल्याचे दिसून येतात. त्यामुळे, आमदार म्हणजे श्रीमंतांच्या यादीतच त्यांची गणना केली जाते. त्यातच, गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शिवसेना पक्षात झालेल्या बंडाळीमुळे आमदारांवर पैसे घेतल्याचे गंभीर आरोप केले जात आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना ५० खोक्के, एकदम ओक्के म्हणत चिडवले जाते. मात्र, याच शिंदे गटासोबत गेलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री आजही गावच्या यात्रेत बांबूच्या टोपल्या विकताना दिसून आल्या. 

चंद्रपूर शहरात सध्या माता महाकालीची यात्रा सुरु आहे. या यात्रेत एक  रस्त्याच्या कडेला बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आजीबाईंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. कारण, या आजीबाई केवळ सुपल,दुर्डी-टोपलं विकणाऱ्या बाई नसून राज्याच्या विधानसभा सदस्यांच्या म्हणजेच आमदाराच्या मातोश्री आहेत. त्यातही विशेष बाब म्हणजे शिंदे गटासोबत गेलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या त्या आई आहेत. ज्या आमदारांनी ५० कोटी घेतल्याचे आरोप केले जातात, त्या आमदारांची आई रस्त्यावर बसून टोपलं विकताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. 

गंगुबाई जोरगेवार या चंद्रपूर किंवा तालुक्यातील भागात अम्मा नावाने सर्वांना परिचीत आहेत. मुलगा आमदार असतानाही यात्रेत मोठी मागणी असते म्हणून आजही टोपलं, सुपली-दुर्डी विकताना दिसून येतात. वयाच्या ८० व्या वर्षीही गंगुबाई यंदा देवी महाकाली यात्रेत आपला व्यवसाय करताना दिसून आल्या. त्यांचे सुपुत्र किशोर जोगरेवार हे गत पंचवार्षिक निवडणुकीत २०१९ साली पहिल्यांदा आमदार बनले. विशेष म्हणजे मुलगा आमदार बनल्यानंतरही आपण आपला व्यावसाय सोडणार नसल्याचं त्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानुसार, गावच्या यात्रेत त्यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.  

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरMLAआमदारEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना