शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
4
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
5
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
6
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
7
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
8
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
9
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
10
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
11
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
12
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
13
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
14
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
15
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
16
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
17
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
19
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

क्षुल्लक कारणावरुन वाद, रागाच्या भरात दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 12:24 PM

ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे एका महिलेने पतीसोबत झालेल्या वादातून रागाच्य भरात स्वतःच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देतिघांचाही करुण अंतब्रह्मपुरी तालुक्यातील घटना

रवी रणदिवे

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : क्षुल्लक वादातून रागाच्या भरात घरून निघून जात दोन चिमुकल्या मुलांसह मातेने शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी शेतशिवारात रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रागाच्या भरात माणूस काय करेल काही सांगता येत नाही.  मालडोंगरी येथेही घरगुती भांडणाचा राग मनात ठेवत एका महिलेने आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत ढकलत स्वत:ही उडी मारून जीवन संपविले. दीपाली रवी पारधी (३०), असे मृत महिलेचे नाव असून, पीयूष (६), आयुष (३), तिघेही रा. मालडोंगरी अशी चिमुकल्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, दीपाली पारधी हिचे शनिवारी पती रवी पारधी याच्यासोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. याचा राग दीपालीच्या मनात असावा.

शनिवारी दुपारी मुलांसह शेतावर कामाला जाते असे सासूला सांगून दीपाली पीयूष आणि आयुषला घेऊन घरून निघून गेली. मात्र, सायंकाळ होऊनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने तिचा गावात व शेतशिवारात शोध घेतला. रविवारी ब्रह्मपुरी-मालडोंगरी रस्त्याजवळच्या एका शेतातील विहिरीत दीपाली व तिच्या दोन मुलांच्या चपला पाण्यावर तरंगताना आढळून आल्या.

पोलीस निरीक्षक रोशन यादव, सहायक पोलीस निरीक्षक अनिल कुमरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गेडाम, विजय मैंद, उमेश बोरकर यांनी घटनास्थळ गाठले. विहिरीतून दीपाली व दोन्ही चिमुकल्या मुलांचे मृतदेह काढण्यात आले. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी भेट देत घटनेची माहिती जाणून घेतली. मृत महिलेच्या पश्चात पती व सासू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बिबट्याचा मृत बछडाही आढळला

दीपाली, पियुष व आयुष यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढत असताना गावकऱ्यांना विहिरीत बिबट्याचा बछडाही मृतावस्थेत आढळून आला. त्यालाही बाहेर काढण्यात आले. याची माहिती ब्रम्हपुरी वनविभागाला देताच वनविभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, मृत बछडा तीन ते चार महिन्याचा असून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. आज सोमवारी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती ब्रम्हपुरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्म्णे यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार