शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

अवकाळी पावसाने एका रात्रीत केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

खरिपात झालेले नुकसानीचे दु:ख विसरून आता शेतकऱ्यांनी रबी पिकांची लागवड केली. मात्र येथेही निसर्ग आडवा येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे ढगाळ वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला.

ठळक मुद्देजिल्हाभरात मोठे नुकसान : आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. अशातच अवकाळी पाऊसही हजेरी लावत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्हाभर मुसळधार पाऊस बरसला. बुधवारी रात्रीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. सातत्याने ढगाळ वातावरण आणि अधेमधे पाऊस बरसत असल्याने गहू, हरभरा, तूर आदी रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. खरीप हंगामातील धान आणि कापसाचेही नुकसान झाले आहे.खरिपात झालेले नुकसानीचे दु:ख विसरून आता शेतकऱ्यांनी रबी पिकांची लागवड केली. मात्र येथेही निसर्ग आडवा येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे ढगाळ वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला. ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी पिकांना मोठा फटका बसत आहे. रबी पिके आठवडाभरापूर्वी चांगली भरात आली होती. मात्र अचानक वातावरणात बदल झाला आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्हाभरातच जोरदार पाऊस बरसला. किमान अर्धा-एक तास हा पाऊस कायम राहिला. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आणखी पाऊस बरसला.या पावसामुळे खरीपातील धान, कापूस आणि रबीतील सर्व पिकांना जोरदार फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचा फुलोरा गळत असल्याने उत्पादन वाढीला फटका बसण्याची शक्यता आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीला दिवसेंदिवस उतरती कळा आली आहे. पिकांची स्थिती चांगली असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने कापसासह रबी हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याख्नाली असलेला शेतकरी धास्तावला आहे. अकाली पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहेत. कृषी विभागाने सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी आहे.नागरिकांच्या आरोग्यावरही परिणामसातत्याने ढगाळ वातावरण आणि अकाली पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत असून रुग्णालयात बालगोपालांची उपचारासाठी गर्दी दिसत आहे. सूर्यानेही नागरिकांना दर्शन देणे कमी केले आहे. सकाळपासून सुरू झालेले ढगाळ वातावरण रात्रीपर्यंत कायम राहत आहे. केव्हा सूर्यादय होतो आणि केव्हा मावळतो, हेच कळेणासे झाले आहे.भाजीपाला पिकाचेही नुकसानभद्रावती, वरोरा, सिंदेवाही, नागभीड या तालुक्यात बऱ्यापैकी भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. अनेकांच्या वाड्या आहेत. मात्र बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. याशिवाय भद्रावती तालुक्यात गाराही पडल्या. त्यामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.ढगाळ वातावरणामुळे थंडी कमीचंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी कडाक्याची थंडी पडू लागली होती. पारा चक्क ५.१ अंशापर्यंत घसरला होता. त्यामुळे आता जानेवारी महिना संपेपर्यंत अशीच थंडी कायम राहील, असे वाटले होते. मात्र ढगाळ वातावरणाने थंडीचा जोर कमी करून टाकला आहे. सातत्याने ढगाळ वातावरण राहत असल्याने पारा वाढला आहे. बुधवारी तापमान १६.६ अंशापर्यंत आले.

टॅग्स :Rainपाऊस