शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पैसा झाला खोटा; दहा रुपयांचे नाणे चालेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

रिझर्व बॅंकेने दहा रुपयांचे नाणे २००९ मध्ये चलनात आणले होते. मात्र बरेचदा हे नाणे बंद झाल्याची अफवा पसरविण्यात आली. ग्रामीण भागात ही अफवा तर वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे आरबीआयने दहा रुपयांचे नाणे बंद झाले नसून चलनात वैध असल्याचे स्पष्ट केले. दहा रुपयांची १४ प्रकारची नाणी वैध असून सर्वांनीच त्याचा चलनात उपयोग करावा, असे आवाहन रिझर्व बॅंकेने केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहा रुपयांचे नाणे सुरुच असून ते चलनाचा एक भाग आहेत. असा निर्वाळा रिझर्व बँकेने दिला असला तरी जिल्ह्यातील किरकोड व्यावसायिक तसेच ग्राहकांकडून दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. रिझर्व बँकेने सन २००९ मध्ये दहा रुपयांची नाणी चलनात आणली. ते नाणे आताही चलनात आहे. मात्र अनेकजण त्याचा स्वीकार करत नसल्याने अनेकांजवळ नाणी संग्रहीत होऊन आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात किरकोळ व्यावसायिक व ग्राहकही दहा रुपये नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्याचे अनेकदा बघायला मिळते.

कुठल्याच नाण्यावर बंदी नाहीरिझर्व बॅंकेने दहा रुपयांचे नाणे २००९ मध्ये चलनात आणले होते. मात्र बरेचदा हे नाणे बंद झाल्याची अफवा पसरविण्यात आली. ग्रामीण भागात ही अफवा तर वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे आरबीआयने दहा रुपयांचे नाणे बंद झाले नसून चलनात वैध असल्याचे स्पष्ट केले. दहा रुपयांची १४ प्रकारची नाणी वैध असून सर्वांनीच त्याचा चलनात उपयोग करावा, असे आवाहन रिझर्व बॅंकेने केले आहे.

कोणती नाणी नाकारतातसध्या चलनात असलेल्या नाण्यांपैकी एक, दोन, पाच रुपयांची नाणी सर्वजण बिनदिक्कत स्वीकारतात. मात्र दहा रुपयांची नाणी घेण्यास अनेकजण नकार देतात. एखाद्या वेळेस दहा रुपयांची जुनी नाणी स्वीकारतील, परंतु, पितळ व स्टेलनेस स्टील असे दुहेरी आवरण असलेली नाणी स्वीकारण्याचे टाळतात. 

बँकामध्येही नाण्यांचा मोठा साठाबाजारपेठेत किंवा अनेक ठिकाणी दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास अनेकदा नकार मिळतो. मात्र बँकेमध्ये हे नाणे स्वीकारले जाते. त्यामुळे बॅंकांमध्ये दहा रुपयांच्या नाण्यांचा मोठा साठा उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात नाणी जमा करायची असल्यास ती कुठून आली, याचे कारण बॅंकेत सादर करावे लागते.

पैसा असूनही अडचण

माझी मुलगी पिग्मी बॅगमध्ये पैसे गोळा करायची. त्यामध्ये केवळ दहा व पाच रुपयांचे नाणे टाकायची. काही महिन्यांनंतर ते पैसे काढले. परंतु, कोणतीही खरेदी करावयास गेल्यास नाणी स्वीकारतच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही नाणी करायची काय, असा प्रश्न आहे. -राकेश रायपुरे

भाजीपाला विक्रेते किंवा किरकोळ विक्रेते दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे कोणीही जर आपणाला दहा रुपयांचे नाणे देत असेल तर घेण्यास भीती वाटते. त्यामुळे शक्यतो दहा रुपयांची नाणी घेण्यास अनेक जण टाळाटाळ करतात. - संघर्ष सिद्धमशेट्टीवार

रिझर्व बॅंकेकडून चलनात आलेले दहा रुपयांचे नाणे बंद झाले नाही. याबाबत अनेकदा जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज न बाळगता दहा रुपयांच्या नाण्याचा व्यवहारात वापर करावा. बॅंकेतसुद्धा दहा रुपयांची नाणे स्वीकारले जातात.-ब्रिजेश बांबोळे, सहायक व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया, चंद्रपूर

 

टॅग्स :MONEYपैसाbankबँक