शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

भूमी अभिलेखचे आधुनिकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:00 IST

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांना मिळकत पत्रिका,.,...

ठळक मुद्देअद्यावत सेवा : माहिती देण्याची पद्धत होणार सुलभ

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांना मिळकत पत्रिका, टिपण, क्षेत्रबुक, शेतपुस्तक, आकारबंद, आकारफोड, गट नकाशा, मोजणी नकाशा, कमी जास्त पत्रक, चौकशी नोंदवही, सनद, अपील प्रकरणाच्या नकल, मोजणी प्रकरणाची नकल यासारख्या विविध सेवा पुरविण्यात येतात. या सेवा सहज, सोप्या पद्धतीने सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिलेखचे संधारण व आधुनिकीकरण करण्याचे काम भूमी अभिलेख विभागातर्फे सुरू आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत २ आॅक्टोबर २०१७ ते १० एप्रिल २०१८ या कालावधीत नागपूर विभागामध्ये आदर्श अभिलेख कक्ष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांतील ७३ कार्यालयांनी सहभाग नोंदविलेला आहे. या स्पर्धेकरिता भूमिअभिलेख विभागातील आदर्श अभिलेख कक्षाच्या रचना व कार्यपद्धतीमधील कार्यालयीन व्यवस्थापनाचे मूलभूत घटक यांचा समावेश करण्यात आला आहे.यामध्ये अभिलेख कक्षाची रचना, अभिलेखाची मांडणी, अभिलेख कक्षाचे संरक्षण, अभिलेख नकाशात काढणे, स्कॅनिंग व कम्प्युटरॉयझेशन, कार्यालयीन परिसर स्वच्छता यासह इतरही निकषांचा समावेश करण्यात आलेला आहे. भूमी अभिलेख विभागातील नामांतरण, खरेदी-विक्री, वारसान हक्काने होणारे फेरफार यासंबंधीचे अभिलेख संगणकीकृत व अद्यावत करून नागरिकांना वेळेत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.नागपूर येथील भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक अभय जोशी, नागपूरचे जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे, गडचिरोलीचे जिल्हा अधीक्षक गजानन डाबेराव, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर अभियान सुरू असून आधुनिकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.यापूर्वी कागदी माहिती पत्रामुळे अनेकांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. मात्र या त्रासापासून आता मुक्ती मिळणार आहे.