शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:17 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, पारंपरिक शेतीतून सुटका होऊन आर्थिक प्रगती करता यावी, या हेतूने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले. हे वाचनालय २० गावांत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसोबतच शेतकऱ्यांना ज्ञानाच्या कक्षा ...

ठळक मुद्देगावखेड्यांत जागर : २० गावांमध्ये सुरू झाले पालकमंत्री कृषी वाचनालय

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, पारंपरिक शेतीतून सुटका होऊन आर्थिक प्रगती करता यावी, या हेतूने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले. हे वाचनालय २० गावांत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसोबतच शेतकऱ्यांना ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याची संधी मिळाली आहे.पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकाभिमुख उपक्रमांतून विकासकामांना चालना मिळाली. शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. ना. मुनगंटीवार यांनी विशेष पुढाकार घेऊन काही लक्षवेधी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. चंद्रपूर, मूल, बल्लारपूर आणि पोंभूर्णा चार तालुक्यांतील २० गावांमध्ये पालकमंत्री कृषी वाचनालय करण्यास पुढाकार घेतला.चंद्रपूर तालुक्यातील मामला, चेक निंबाळा, शिवणी चोर, मूल तालुक्यातील चिचाळा, उथळपेठ, बोरचांदली, नांदगाव, भवराळा, हळदी, दाबगाव, गडीसुर्ला, पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव, चेक बल्लारपूर, घाटकुळ, पिपरी देशपांडे, आंबेधानोरा, उमरी पोतदार, आष्टा, नवेगाव मोर आणि बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव आदी २० गावांमध्ये पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात १०० पुस्तकांचा एक संच उपलब्ध करण्यात आला. ही सर्व पुस्तके कृषी विषयक मार्गदर्शन करणारी आहेत. विविध प्रकारची खते व बियाण्यांची माहिती, नवनवे पीक कसे घ्यायचे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी वाचनालय अतिशय उपयुक्त ठरणार आहे. वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कृषी उत्पन्नवाढीला चालनापालकमंत्री कृषी वाचनालयातील पुस्तकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाची माहिती गावातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर प्रबोधनसभा तसेच प्रचार व प्रसाराचे कार्य नियमितपणे सुरू राहणार आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या लोकोपयोगी उपक्रमामुळे कृषी उत्पन्न वाढीला चालना मिळणार आहे.