शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

संभाजी भिडेंविरोधात आमदार विजय वडेट्टीवारांची पोलिसांत तक्रार

By राजेश भोजेकर | Updated: July 31, 2023 13:52 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप

चंद्रपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे 27 जूलै रोजी एका सभेमध्ये मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी ब्रम्हपुरी पोलिसांत दिली आहे.

संभाजी भिडेनी सभेत केलेल्या वक्तव्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी हे करमचंद गांधी यांचे पुत्र नसून एका मुस्लिम धर्मीय इसमाचे पुत्र असल्याचे सांगितले आहे. त्या वक्तव्यात महात्मा गांधी व त्यांच्या आईच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवले आहेत. महात्मा गांधी हे केवळ भारताचा सन्मान नसुन संपुर्ण जगाचा सन्मान आहेत. संपुर्ण जगात महात्मा गांधी यांच्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास केला जातो. त्यांनी संपुर्ण जगाला शांती, अहींसा, प्रेम याचा संदेश दिला म्हणून 2007 पासून संयुक्त राष्ट्रसंघाने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती जागतीक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार संपूर्ण जग गांधी जयंतीला जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करते. महात्मा गांधी यांच्या व्यक्तीमत्वाचा अनेक महान विभूतीवर प्रभाव होता.

महान वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी महात्मा गांधी हा केवळ हाडामासाचा माणूस नसून जीवंत विचार आहे असे सांगितले होते. अशा महान विभूतीबद्दल संभाजी भिडे यांनी काढलेले उद्गार हे महात्मा गांधी यांना मानणाऱ्या करोडो अनुयायांमध्ये असंतोष निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने अनेक भारतीयांच्या मनात भिडे विरोधी निषेधाची भावना आहे. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणे. द्वेष भावना कलुषित करणे. जातीय दंगली घडाव्यात यासाठी तरुणांना प्रेरित करणे असे कृत्य सदर गृहस्थ नेहमीच करीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी ब्रम्हपूरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.

तक्रार देतेवेळी त्यांच्या सोबत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर,  न.प. आरोग्य सभापती अॅड. बाला शुक्ला, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके यांसह अन्य काॅंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसMahatma Gandhiमहात्मा गांधी