शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यात आता ‘मिशन गरूडझेप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 05:00 IST

विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांना योग्यवेळी आणि योग्य वयात संस्कार करणे गरजेचे आहे. बालवयामध्ये त्यांच्यामध्ये शिक्षणाबाबत अधिक महत्त्व पटवून देत त्यांच्यातील बुद्धिमत्तेला चालना देणे गरजेचे आहे. त्याच उद्देशाने मिशन गरुडझेप प्रयत्न करणार आहे. विशेषत: मूलभूत क्षमता, अध्ययन निष्पत्ती तसेच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना ओळखून त्या-त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांच्यातील आवडी-निवडी ओळखून त्या-त्या विषयांमध्ये अधिक सखोल ज्ञान मिळावे यासोबतच जिल्ह्यात भविष्यात स्पर्धा परीक्षेचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यात ‘मिशन गरुडझेप-२०२१’ हा पायलट प्रोग्राम जिल्हा परिषद सीईओ मिताली सेठी यांनी राबविण्याचा संकल्प केला आहे. यासाठी  सुपर-६० सदस्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ६० जणांना प्रथम आपल्या शाळांमध्ये गुणवत्तेसाठी काय प्रयत्न केले, याचे सादरीकरण दर महिन्यांत सीईओंसमोर करावे लागणार आहे.विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांना योग्यवेळी आणि योग्य वयात संस्कार करणे गरजेचे आहे. बालवयामध्ये त्यांच्यामध्ये शिक्षणाबाबत अधिक महत्त्व पटवून देत त्यांच्यातील बुद्धिमत्तेला चालना देणे गरजेचे आहे. त्याच उद्देशाने मिशन गरुडझेप प्रयत्न करणार आहे. विशेषत: मूलभूत क्षमता, अध्ययन निष्पत्ती तसेच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना ओळखून त्या-त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एकूण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ‘मिशन गरूडझेप’-सुपर ६० सदस्य प्रयत्न करणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी डायटचे प्राचार्य धनंजय चाफले यांच्यासह त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहे.

सीईओंसमोर गुणवत्ता करावी लागणार सिद्धविद्यार्थ्यांची गुणवत्ता  वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी  सुपर-६० गटातील सदस्यांना प्रथम आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे.  गुणवत्तेसाठी महिनाभरात काय प्रयत्न केले. याबाबत सीईओंसमोर सादरीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे आता काही शिक्षक कामालासुद्धा लागले आहे.

गावागावांत राहणार वाचनालयगुणवत्ता वाढविणे म्हणजेच एकूण विद्यार्थ्यांची प्रगती साध्य करणे, यासाठी वाचन, लिखाणाची आवड निर्माण करण्यासाठी गावागावांत वाचनालय स्थापन करून या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निमार्ण करण्यात येणार आहे. वाचनालयामध्ये दैनिक, साप्ताहिके, पाक्षिक आणि मासिके ठेवण्याबाबतची ‘सुपर-६०’ सदस्यांनी बैठकीप्रसंगी सांगितले आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी घडणार विद्यार्थी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काही कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ते स्पर्धा परीक्षांपासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांना ओळखून त्यांच्यातील गुणवत्ता तपासून त्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषत: प्रज्ञाशोध, नवोदय यासोबतच भविष्यातील एमपीएससी, युपीएसई स्पर्धा परीक्षा कशा द्यायच्या याबाबत त्यांना प्राथमिक शिक्षणापासून मार्गदर्शन केले जाणार आहे.

मिशन गरुडझेप अंतर्गत सुपर-६० शिक्षण तज्ज्ञ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात गुणवत्ता वाढीसोबतच विद्यार्थ्यांचा एकूणच सर्वांगीण विकास करण्यावर भर राहणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना विश्वासात घेऊन गावांमध्ये वाचनालय, स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तयार करण्यात येणार आहे.-मीताली सेठीमुख्य कार्यपालन अधिकारी, जि. प. चंद्रपूर

 

टॅग्स :Studentविद्यार्थीzpजिल्हा परिषद