शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकावर लष्करी अळीचे आक्रमण

By admin | Updated: August 30, 2014 01:20 IST

यावर्षी पोंभुर्णा तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला असून तालुक्यात ४० ते ५० टक्के धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेकांचे धान पीक करपायला लागले आहेत.

देवाडा (खुर्द) : यावर्षी पोंभुर्णा तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला असून तालुक्यात ४० ते ५० टक्के धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेकांचे धान पीक करपायला लागले आहेत. उर्वरित पीक काही प्रमाणात तग धरुन असतानाच वाढत्या उन्हामुळे लष्करी अळीने धान पिकावर आक्रमण केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षी झालेल्या संततधार पावसाने संपूर्ण परिसरामध्ये कहर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्या संकटातून स्वत:ला सावरत परिसरातील शेतकऱ्यांनी हतबल न होता यावर्षी पुन्हा जोमाने मशागतीला सुरुवात केली. मात्र यावर्षी पुन्हा निसर्ग कोपला. तालुका परिसरामध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात महागडी बिजाई, खत घेऊन रोवणी केली. बँकेचे कर्ज घेऊन पैशाची व्यवस्था केली. रोवणी झाल्यापासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु अजुनपर्यंत वरूणराजाला शेतकऱ्यांची केविलवाणी अवस्था दिसली नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील संंपूर्ण पिके करपायला लागली आहेत. त्यातच काही पीक तग धरुन असताना त्यावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने उरले-सुरले पिकही हातून जाण्याची वेळ आल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. लष्करी अळीने एवढे उग्ररुप धारण केले आहे की, धान पिकासह शेतात असणाऱ्या (गवत) तणावरही या अळ्या ताव मारत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा मिळणेही दुरापास्त झाले आहे. परिसरात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत कृषी कार्यालयात संपर्क साधला असता, सध्या औषधी उपलब्ध नसल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले. वरिष्ठस्तरावर औषधीची मागणी करण्यात आली असून औषधी उपलब्ध होताच, ती पुरविण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी स्पष्ट केले. सध्या तालुक्यातील धान पिकावर लष्करी अळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. लष्करी अळीचा प्रकोप रोखण्यासाठी शेतकरी खासगी कृषी केंद्रातून औषधे घेऊन फवारणी सुरू केली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कृषी विभागाने तात्काळ पोंभुर्णा कार्यालयात औषधी साठा उपलब्घ करुन स्थानिक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर औषधांचा पुरवठा करावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन चलाख यांनी केली आहे. (वार्ताहर)