शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

सुक्ष्म सिंचनाला ‘ठिबक, तुषार’ची चालना

By admin | Updated: June 4, 2015 01:20 IST

राज्यात सिंचनाचा अनुशेष सर्वात जास्त विदर्भात आहे. सिंचनाअभावी विदर्भाच्या काळ्या कसदार जमिनीची अत्युच्च उत्पादकता असूनही शेतकरी प्रति हेक्टरी ...

चंद्रपूर : राज्यात सिंचनाचा अनुशेष सर्वात जास्त विदर्भात आहे. सिंचनाअभावी विदर्भाच्या काळ्या कसदार जमिनीची अत्युच्च उत्पादकता असूनही शेतकरी प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यात कमी पडत आहेत. सिंचन सुविधा नसल्यामुळे वर्षांत केवळ खरीप हंगामातील पिकांवरच शेतकरी अवलंबून असतात. विदर्भातील सिंचनाचे प्रमाण वाढून जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बागायतदार व्हावे, या उद्देशाने शासनाने विदर्भाच्या शाश्वत सिंचनासाठी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमात विदर्भातील ११ जिल्ह्यांचा समावेश असून चंद्रपूर जिल्ह्यातील ६८७ शेतकऱ्यांना या कार्यक्रमाचा लाभ झाला आहे. जिल्ह्यातील ६७५.४९ हेक्टरवर ठिबक व तुषार सुक्ष्म सिंचनासाठी तब्बल १ कोटी १२ लाख १ हजार रूपये आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे. विदर्भात कमी व बेभरवशाचे पर्जन्यमान तसेच सिंचन सुविधांचा अभाव, जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, पिकावरील किड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेती उत्पादनाबाबत शाश्वती देता येत नाही. विदर्भातील शेतीची पीक उत्पादकता देशाच्या तसेच राज्याच्या उर्वरित भागाच्या तुनलेत खुप कमी आहे. त्यामुळे विदर्भात शेती खर्चिक ठरत असून येथील शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे शेती व्यवसाय करणे जोखमीचे झाले आहे, असे निष्कर्ष शेती संदर्भात विविध स्तरावरील समित्यांचे अहवाल, संशोधनातील निष्कर्ष व कृषी तज्ञ्जांच्या क्षेत्रीय भेटीच्या अहवालात काढण्यात आले आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन विदर्भातील शेती फायद्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम २०१२ हा कालबध्द कार्यक्रम आहे. (स्थानिक प्रतिनिधी)या पिकांची झाली लागवड २०१४-१५ या वर्षांत ६७५.४९ हेक्टरवर ठिबक व तुषार सुक्ष्म सिंचनासाठी ११२ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला. यात कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, केळी, मिरची, भाजीपाला, फुलशेती या पिकांची शेतकऱ्यांनी लागवड करून उत्पादन घेतले आहे. या कामांना प्राधान्य लघु पाटबंधारे योजनांचे मुल्यवर्धन करणे, नवीन २५० हेक्टर सिंचन क्षमतेची कामे हाती घेणे, भुगर्भातील पाणी पातळीत वरच्या स्तरापर्यंत आणून सिंचन क्षमता वाढविणे, मालगुजारी किंवा शिवकालीन तलाव, कोल्हापूरी पद्धतीचा बंधाऱ्याची जलसंचय क्षमता वाढविणे, २५० हेक्टर एवढी सिंचन क्षमता असलेल्या लघुसिंचन योजनांची स्थानिकांच्या मागणीनुसार दुरूस्ती करणे, शेततळ्यांचे स्थानिक गरजेनुसार व मागणीनुसार पुर्नभरण करणे व शाश्वत संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आदी उद्देशांची पूर्ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कामे पूर्ण झालेल्या लघु पाटबंधारे व कोल्हापूरी बंधाऱ्याच्या देखभालीसाठी आणि सिंचनासाठी हस्तांतरण केलेल्या पाणी वाटप संस्थांना शासनाच्या धोरणानुसार अनुदान देणे, तसेच पूर्ण होत असलेल्या नवीन लघु पाटबंधारे योजनांचे सिंचन क्षेत्र व्यवस्थापन हस्तांतरणासाठी नवीन पाणी वाटप संस्था सुरू करणे आदी उद्देशही कार्यक्रमाचे आहेत.