शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाच्या माध्यमातून आता ‘बेटी बचाव’चा संदेश

By admin | Updated: August 25, 2016 00:42 IST

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीला या वर्षात १२५ वर्षे पूर्ण होत आहेत.

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानातून प्रबोधन : तालुकास्तरासह विभागावर मिळणार पारितोषिकचिमूर : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीला या वर्षात १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या टिळकांच्या उद्गाराचे चालु वर्षे हे शतक महोत्सवी वर्षे आहे. या नेत्यांची जीवनगाथा व कार्य विविध माध्यमाद्वारे जनतेपर्यंत प्रामुख्याने तरुणांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने गणेशउत्सव दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. गणेशोत्सव दरम्यानच गणरायांच्या माध्यमातून आता ‘बेटी बचाव’चा संदेश देण्यात येणार आहे.‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ हा उपक्रम येणाऱ्या गणेश उत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरू केली. या उत्सवादरम्यान शासनाने या वर्षांपासून उपक्रमाद्वारे जनजागृती घडवतील अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व विभागीयस्तरावर घेण्यात येणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गणेश मंडळास गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत, देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदी विषयाबाबत समितीकडून मूल्यांकन करून शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विजेत्या मंडळास रोख बक्षिसासह गौरव करण्यात येणार आहे.या स्पर्धेत भाग घेण्याकरिता सार्वजनिक गणेश मंडळांना स्वदेशी, साक्षरता, बेटी-बचाव, व्यसनमुक्ती व जनसंवर्धन यापैकी एका कल्पनेवर आधारीत देखावा करणे आवश्यक राहणार आहे. या स्पर्धेत धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी केलेले मंडळांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता २९ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करता येणार आहे. सध्या अनेक मानवनिर्मीत समस्या असून या सर्व समस्या माणसाच्या प्रबोधनातूनच कमी होवू शकतात. तर देशात व राज्यात स्त्री भ्रृणहत्या, महिलावरील अत्याचार आजही कमी झाले नाही. त्यामुळे शासन अनेक प्रबोधनाचे उपक्रम राबवित आहे. या वर्षाच्या गणेशोत्सवापासून तर शासनाकडूनन या समस्येच्या जनजागृतीसाठी गणरायाच्या माध्यमातूनच ‘बेटी बचाव’ चा संदेश देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)असे असणार पुरस्कारविभागीय स्तरावरील प्रथम विजेत्यास दोन लाख रुपये, द्वितीय विजेत्यास एक लाख ५० हजार रुपये तर तृतीय विजेत्यास एक लाख रुपये रोख, जिल्हास्तरावर प्रथम विजेत्या मंडळास एक लाख, द्वितीय ७५ हजार, तृतीय ५० हजार रुपये रोख, तालुकास्तर प्रथम २५ हजार, द्वितीय १५ हजार तर तृतीय १० हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.तालुकास्तरीय त्रिसदस्यीय परीक्षण समितीया त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी राहतील. तर तालुक्यातील शाळा महाविद्यालयाचे कला शिक्षक किंवा प्राध्यापक तथा एन.एस.एस.च्या प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही समिती ८ ते १२ सप्टेंबर दरम्यान प्रत्यक्ष भेट देवून शासनाने ठरविल्यानुसार मूल्यांकन करणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील किमान पाच मंडळानी भाग घेणे आवश्यक राहणार आहे. पाच पेक्षा जास्त मंडळे असेल तर तीन पुरस्कार, चार मंडळानी भाग घेतला तर दोन बक्षीस तर तिनच मंडळानी भाग घेतला तर फक्त प्रथम पुरस्कार देण्यात येणार आहे.