शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ क्षेत्रासाठी मेरी गो राऊंड रेल्वे सेवा आता आवश्यकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

मेरी गो राऊंड ही रेल्वे सेवा बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सुरू होऊन चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, सेवाग्राम, नागपूर भंडारा, गोंदिया, वडसा, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, चांदा फोर्ट ते बल्लारशाह याप्रकारे मध्य रेल्वे व दक्षिण, पूर्व, मध्य रेल्वेअंतर्गत मेरी गो राऊंड रेल्वे सेवा सुरू केल्याने चंद्रपूर, गडचिरोलीच्या विकासाला गती मिळेल. म्हणून ही सेवा सुरू करण्यासाठी त्वरित मंजुरी द्यावी. 

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : महाराष्ट्राच्या विदर्भ क्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा नक्षलप्रभावित असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासासाठी नेहमी अडथळे येतात. जिल्ह्यात तोट्यात चालणाऱ्या महामंडळाच्या बसेस आहेत. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना जलद सुविधा देण्यासाठी मेरी गो राऊंड रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी रेल्वेचे महाप्रबंधक यांना बल्लारशाह रेल्वे स्थानकावर निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन घनश्याम मुलचंदानी यांच्यासह डीआरयूसीसीचे सदस्य जयकरणसिंग बजगोती व शिष्टमंडळातील सहकाऱ्यांनी महाप्रबंधक यांना दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मेरी गो राऊंड ही रेल्वे सेवा बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सुरू होऊन चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, सेवाग्राम, नागपूर भंडारा, गोंदिया, वडसा, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, चांदा फोर्ट ते बल्लारशाह याप्रकारे मध्य रेल्वे व दक्षिण, पूर्व, मध्य रेल्वेअंतर्गत मेरी गो राऊंड रेल्वे सेवा सुरू केल्याने चंद्रपूर, गडचिरोलीच्या विकासाला गती मिळेल. म्हणून ही सेवा सुरू करण्यासाठी त्वरित मंजुरी द्यावी. याशिवाय बाळू धानोरकर यांनी भद्रावती रेल्वे स्टेशन हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ व महत्त्वपूर्ण उद्योग असल्यामुळे  बंद झालेले सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे थांबे त्वरित सुरू  केले आहे. अजूनही हेदराबाद- निजामुद्दीन, चेन्नई-लखनौ, बल्लारपूर-भुसावळ सेवाग्राम लिंक एक्स्प्रेस, ताडोबा एक्स्प्रेसल बल्लारपूर-मुंबई एक्स्प्रेस तसेच सिकंदराबाद येथून कागजनगरपर्यंत धावणारी भाग्यनगरी पॅसेंजर बल्लारशाह स्थानकापर्यंत सुरू करावी, याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण मागण्या निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहेत. याकडे संबंधित विभाग गांभीर्याने बघेल, अशी आशा आहे.

टॅग्स :railwayरेल्वे