शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

जनता महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:25 PM

२० वर्षांपूर्वी जनता डी.एड. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा जनता कॉलेज मध्ये उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देहेमकलसा भेटीने समारोप : २० वर्षांनतर एकत्र आले माजी विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २० वर्षांपूर्वी जनता डी.एड. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा जनता कॉलेज मध्ये उत्साहात पार पडला.अध्यक्षस्थानी जनता डीएड कॉलेजचे तत्कालिन प्राचार्य जीवने तर प्रमुख पाहूणे म्हणून बनकर, समाधान गावंडे श्रीकांत कावळे व अन्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. अध्यापक तेलंग अरुणावती कावळे, मोहम्मद रजा, माधव मदनकर, नंदू मसे, पोलीस अधिकारी छत्रपती चिडे आदींनी श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.त्यावेळी वादविवाद स्पर्धेत राज्यातून पहिले आलेले व बीड येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक कचरू चांभारे, शीतल लाभे, चिमूर येथील गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे, रेखा लोहकरे, गणेश ढगे, सतीश मालेकर, प्रशांत बांबोळे, आशा प्रधान, भावना गुंडमवार, ज्ञानेश्वर चौधरी, विश्वास बानकर यांनी कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य जीवने यांनी विचार मांडले. संचालिका स्मिता जीवतोडे यांनी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्याची स्तूती केली.मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांचा कंठ दाटून येत होता. बुलढाणा येथील संचालन गजानन वानखेडे यांनी केले. आभार प्रवीण रायपुरे यांनी मानले. स्नेहमिलनाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. डॉ. प्रकाश आमटे, मंदा आमटे यांच्याशी संवाद साधून विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. चंद्रपुरातील शैक्षणिक वातावरण योग्य होते. विद्यार्थी दशेत उत्तम संस्कार मिळाल्याने जीवनात प्रगती करता आली, असे मत माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असले तरी चंद्रपूर जिल्ह्याशी संवाद कायम राहिल, असा संकल्पही विद्यार्थ्यांनी यावेळी जाहीर केला. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विविध उपक्रमांवर चर्चा केली. प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक अरूण झगडकर यांनी केले. स्नेहमेळाव्यासाठी कॉलेजचे माजी विद्यार्थी कचरू चांभारे, गणेश ढगे, ज्ञानेश्वर चौधरी, गजानन वानखेडे, रेखा लोहकरे अरविंद चिडे, पल्लवी चिडे, प्रशांत मते, विश्वास बानकर, सचिन मालवी, वैशाली महाकारकार, सुनिल मंगर, विजय भेंडारकर,चांगदेव पाझारे, अरुण झगडकर, अशोक भरडे आदींसह जिल्ह्यातील ७८ माजी विद्यार्थी उपस्थित होते.