या सभेला क्रिष्णा महिला बचतगट, सांगोडा, धनलक्ष्मी महिला बचतगट, बिबी, वीरांगना स्वयंसहायता बचतगट, नांदा व उन्नती स्वयंसहायता बचतगट, नोकारी यांचा समावेश होता. मार्गदर्शनात संजय शर्मा यांनी बचतगटांनी बनविलेल्या साहित्याची विक्री अधिकाधिक कशी करता येईल, हे उदाहरणासह बचतगटांच्या महिलांना समजावून सांगितले.
या सभेला सचिन गोवारदीपे, देविदास मांदाळे व सचिन देवघरे यांचीसुद्धा उपस्थिती होती. विशेष म्हणजे आधी महिला बचतगट चार साहित्य बनवत होते. आता तेच जवळपास १५ साहित्य बनवत असून महिन्याची विक्रीसुद्धा वाढली आहे.
त्यांनी बनविलेल्या साहित्यात अगरबत्ती, धूप अगरबत्ती, फिनाईल, भांड्याचे लिक्वीड, चहापत्ती, निरमा, हळद पावडर, मिरची पावडर, पेपर बॅग, मास्क, लिफाफा, मोहाचे लाडू, तीळगूळ लाडू, प्रसाद दाना, हलवा यांचा समावेश आहे.