चंद्रपूर : भारतरत्न राजीव गांधी २० आॅगस्ट यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यासंबंधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.यावेळी प्रत्येक बुथ कमिटीवर किंवा प्रभागामध्ये सकाळी ११ वाजता चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राजीव गांधी यांना आदराजंली वाहण्याचा कार्यक्रम प्रत्येक बुथच्या माध्यमांनी आपल्या प्रभागात घ्यावा. या संदर्भात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महादेव मंदिर, गोकूल गल्ली, बाजार वॉर्ड चंद्रपूर येथे बैठक घेतली.चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चंद्रपूर जिल्हा (शहर)काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदु नागरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शफीक अहेमद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुनिता लोढीया, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सुभाष गौर, अॅड. विजय मोगरे, अॅड. प्रमोद आनंद, अॅड. भास्कर दिवसे, केशव रामटेके, रत्नमाला बावणे, वंदना भागवत, संजीवनी जोशी, मुश्तरी वहीद शेख उपस्थित होते. होल्डींग लावून पक्षाची जनजागृती व आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात यावा. येणाऱ्या १५ आॅगस्टला सकाळी ७.३० वाजता गांधी चौक येथे झेंडा वंदनाकरीता उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली. संचालन अॅड. शाकीर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
कांँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक
By admin | Updated: August 14, 2014 23:39 IST