शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चार पदाचा भार; क्षयरुग्ण वाऱ्यावर 

By परिमल डोहणे | Updated: May 26, 2024 19:28 IST

तज्ज्ञ सेवेपासून राहावे लागते वंचित.

चंद्रपूर : जिल्हा क्षयरोग केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके यांना सन २०१९ पासून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रतिनियुक्ती दिली आहे. यासोबतच सन २०२३ पासून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा प्रशासकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभारही देण्यात आला आहे. एवढेच नाही तर जिल्हा शल्यचिकित्सक सुट्ट्यावर गेल्यास त्याठिकाणी अतिरिक्त शल्यचिकित्सक असतानासुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक पदाचाही कारभार त्यांच्याकडेच सोपवण्यात येतो.

एकीकडे क्षयरुग्णांची संख्या वाढत असतानाही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर शल्यचिकित्सक कार्यालयात बसविल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच एकाच अधिकाऱ्यांकडे चारचार प्रभार दिल्याने मोठे अर्थकारणही दडले असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे. डॉ. हेमचंद कन्नाके यांची जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी गट-२ म्हणून नियुक्ती आहे. मात्र ९ डिसेंबर २०१९ पासून डॉ. कन्नाके यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) म्हणून प्रतिनियुक्ती दिली आहे. 

त्यामुळे मागील साडेचार महिन्यांपासून ते आपली सेवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात देत आहेत. मात्र त्यांचे वेतन जिल्हा क्षयरोग केंद्रातून निघत आहे. असे असतानासुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक सुट्यांवर गेल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग १, वर्ग २ चे अधिकारी यासोबतच अतिरिक्त शल्यचिकित्सक असतानासुद्धा कन्नाके यांच्याकडेच जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कारभार नेहमीच सोपवण्यात येतो. कन्नाके यांची मूळ पदस्थापना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील नसूनही त्याच्याकडे प्रशासकीय कारभार सोपविण्यात येत असल्याने रुग्णालयातील वर्ग १ व वर्ग २ अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. क्षयरुग्णतज्ज्ञ सेवेपासून वंचितडॉ. हेमचंद कन्नाके यांनी ‘डिप्लोमा इन टीबी ॲन्ड चेस्ट’ चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांची पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमानंतर तज्ज्ञसेवा देण्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथे नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या शिक्षणाचा क्षयरुग्णांना मोठा फायदा झाला असता. मात्र त्यांना प्रतिनियुक्ती दिली असल्याने ते जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात बसत असतात. त्यामुळे सुमारे साडेचार वर्षांपासून क्षयरुग्णांना तज्ज्ञ सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. आयुक्तांकडे तक्रारनियमांचे उल्लंघन करून एकाच व्यक्तीला अनेक प्रभार देण्यात आला असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय चंद्रपूर येथे गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत प्रतिनियुक्तीवर असलेल्या कन्नाचे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून मूळ पद जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथे नियुक्ती करावी, अशी मागणी रुग्णालयाची वर्ग एक अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या उपसंचालक तसेच आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात एसीएस नसल्याने तसेच त्या विभागातून विनंती करण्यात आल्याने कन्नाके यांना प्रतिनियुक्ती दिली आहे. अद्याप माझ्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. -डॉ. कांचन वानेरे, उपसंचालक, आरोग्य विभाग

टॅग्स :chandrapur-pcचंद्रपूर