शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

‘माविम’ने दिला दोन हजार महिलांना गावातच स्वयंरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यातील महिलांना रोजगार व उपजीविका मिळविण्याच्या हेतूने कार्य करीत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी वर्षभर नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत. लॉकडाऊन काळातही स्वयंरोजगाराचे उपक्रम नित्यनेमाने सुरू होते.

ठळक मुद्दे१५ महिला बचतगट आत्मनिर्भर : लॉकडाऊन काळात तयार केल्या देखण्या राख्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात तीन महिने लॉकडाऊन होते. या काळात ग्रामीण भागातील गरीबांचा रोजगार बुडाला. अशाही परिस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालयाने दीर्घकालीन नियोजन करून दोन हजार महिलांना गावातच स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला. रक्षाबंधनासाठी तयार केलेल्या देखण्या राख्या राज्यातील विविध भागांमध्ये पाठविण्याची तयारी केली जात आहे.महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यातील महिलांना रोजगार व उपजीविका मिळविण्याच्या हेतूने कार्य करीत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी वर्षभर नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत. लॉकडाऊन काळातही स्वयंरोजगाराचे उपक्रम नित्यनेमाने सुरू होते. महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्र्रपूर व चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त प्रयत्नातून चंद्र्रपूर, मूल, पोंभुर्णा, चिमूर व विसापूर येथील महिलांना बांबूपासून राखी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. लॉकडाऊनकाळात महिला घरीच होत्या. या वेळेचा त्यांनी सदूपयोग केला. विविध प्रकारच्या हजारो देखण्या राख्या तयार करण्यासाठी माविमने महत्त्वाची भूमिका बजावली. २५० महिलांना गावातच रोजगार मिळाला आहे. कुक्कुटपालन योजनेतंर्गत १ हजार ७३० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. भविष्यातही महिला आर्थिक विकास महामंडळाकडून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. विविध कल्याणकारी उपक्रम राबवून महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर केले जाणार आहे.शेतीच्या कामांसाठी लावले ट्रॅक्टरमानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत ९ तालुक्यातील १५ बचत गटांच्या १८० महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्हा परिषद कृषी विकास विभागाच्या सहाय्याने ट्रॅक्टर व कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यात आले. कृषी अवजारांमुळे महिला व शेतकऱ्यांनी शेतीच्या कामात कामात मदत झाली. सोबतच शेतकरी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी झाला आहे.१३ साधन केंद्रांना दिले बळमाविमच्या वतीने १३ लोकसंचालित साधन केंद्रांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये खुशिया (चंद्रपूर), समन्वय (भद्रावती), सावित्री (वरोरा), आधार, मैत्री (चिमूर), आदर्श (ब्रह्मपुरी), दिशा (नागभीड-सिंदेवाही), मैत्रीण (मूल-सावली), संकल्प (पोंभुर्णा), सहयोग (गोंडपिपरी), सर्वोदय (कोरपना जिवती) व अन्य केंद्रांचा समावेश आहे.नाविण्यपूर्ण कार्पेट युनिटग्रामीण भागातील महिलांना योग्य प्रशिक्षण दिल्यास त्यांच्या सुप्त कलागुणांचा सहजपणे विकास होतो. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात हे, माविम चंद्र्रपूर व वूल रिसर्च असोसिएशनने कार्पेट युनिटद्वारे सिद्ध करून दाखविले. देशभरातील कुठल्याही ग्राहकाला पसंत पडेल, अशा उत्कृष्ट कार्पेटची निर्मिती लॉकडाऊन काळात करण्यात आली. या प्रकल्पाची व्याप्ती वाढत आहे.महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करून नेतृत्व तयार करणे हा माविमचा उद्देश आहे. त्यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. लॉकडाऊन कालावधीत सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्वच प्रकल्प सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे हजारो महिलांना गावात रोजगार मिळाला.- नरेश उगेमुगे, जिल्हा वरिष्ठ समन्वय अधिकारी,महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपूर

टॅग्स :Socialसामाजिक