शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ चंद्रपुरात विशाल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

हंसराज अहीर पुढे म्हणाले, नागरिकता देण्याचा कायदा आहे. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये व नुकताच लोकसभा तसेच राज्यसभेत पारित झालेल्या कायद्यानुसार आता पाच वर्षात नागरिकता देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर । नागरिकत्व संशोधन कायदा समर्थन म्हणजेच देशप्रेम

चंद्रपूर : चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह देशहितासाठी झटत असून त्यांची निती सुध्दा देशहितातच असते. नागरिकत्व संशोधन कायदा हा राष्ट्रहितातच असून देशातील कुठल्याही नागरिकांच्या विरोधात हा कायदा नाही. पाकीस्तान, बांग्लादेश, अफगाणीस्तान येथील अत्याचाराला बळी पडून भारतात आलेल्या तेथील अल्पसंख्यांक हिंदु, शिख, ईसाइ, बौध्द यांना साथ देण्यासाठी आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.गांधी चौक चंद्रपूर येथे सीएए समर्थनार्थ राष्ट्रीय चेतना मंचच्या वतीने आयोजित रॅलीत ते बोलत होते.हंसराज अहीर पुढे म्हणाले, नागरिकता देण्याचा कायदा आहे. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये व नुकताच लोकसभा तसेच राज्यसभेत पारित झालेल्या कायद्यानुसार आता पाच वर्षात नागरिकता देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. हा कायदा मुस्लीमांविरोधात असल्याबाबत कॉंग्रेस व विरोधी पक्ष संभ्रम पसरवीत असून मुस्लीम समाजाला भडकविण्याचे पाप करीत आहे, देशात अशांती व हिंसा पसरवित असल्याची टिका यावेळी हंसराज अहीर यांनी केली. परंतु त्यांच्या या क्रुर राजकारणामुळे जाळपोळीतून व अन्य हिंसक आंदोलनातून राष्ट्रीय संपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे. यासाठी सर्वस्वी कॉंग्रेस व इतर विरोधी पक्ष जबाबदार आहे असेही यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भारतमातेवर, हिन्दुस्थानवर प्रेम करणाऱ्या कोणताही नागरिकाला या कायद्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जे याचा विरोध करीत आहेत त्यांची वृत्ती देशविरोधी आहे. पण अशांना आपण स्पष्ट सांगायचे आहे की, ‘मेरे तिरंगे की ओर गलत नजर से देखोगे, तो ये नजर भी नही बचेगी’ असेही ते म्हणाले. या कायद्यामुळे या देशातील कोणत्याही मुस्लीम धर्मीय बांधवाला कोणताही धोका नाही. देशातील काही राजकीय पक्ष या कायद्याचा बाऊ करत आहेत. अफवा व गैरसमज पसरवून समाजमनात विष कालविण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करीत आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक तुषार देवपुजारी, माजी आमदार शोभा फडणवीस, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, विजय राऊत, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, अ‍ॅड. रवींद्र भागवत, वनिता कानडे, ब्रिजभूषण पाझारे, विजय यंगलवार, राहुल सराफ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. ही रॅली गांधी चौकातून जटपुरा गेट मार्गाने पुन्हा गांधी चौकात येवून विसर्जित झाली.कायदा राष्ट्रहिताचा-मुनगंटीवारया देशात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कामरूखपासून कच्छपर्यंत १३५ कोटी नागरिक जात, धर्म, रंग, वंश यांच्या बाहेर जावून नागरिकत्व सुधारणा कायद्याचे अर्थात सीएएचे समर्थन करीत आहे. मात्र काही राजकारणी स्वार्थापोटी, खुर्चीसाठी या कायद्याला विरोध करत नागरिकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, अफवा पसरवत आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रहीत महत्वाचे नाही, धर्मा धर्मात तेढ निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे. या कायद्यामुळे कोणालाही धोका नाही. धर्माचा आधार घेवून आतंक निर्माण करणाऱ्यांना खरा धोका आहे. या देशावर प्रेम करणाºया कोणत्याही नागरिकाला या कायद्याला घाबरण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या देशावर प्रेम करणाºया नागरिकाला या कायद्यामुळे नुकसान झाल्यास पंतप्रधान पद त्यागण्याची तयारी नरेंद्र मोदींनी दाखविली आहे. त्यामुळे या कायद्याची भीती बाळगण्याची कोणतेही कारण नाही, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.भव्य तिरंगा रॅलीचे आकर्षणसदर रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. अनेक नागरिकांनी हातात तिरंगा झेंडा पकडलेला होता. याशिवाय कित्येक फूल लांब तिरंगा शेकडो नागरिक हात धरून रॅलीत सहभागी झाले होते. हा तिरंगा रॅलीचे आकर्षण ठरला आहे. रॅलीत महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक