शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

चंद्रपूर बंदला अनेकांचा पाठिंबा

By admin | Updated: July 3, 2014 23:29 IST

वैद्यकीय महाविद्यालय व रिलायन्स जीओची टॉवर उभारणी या मुद्यावरून पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर बंदला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रिलायन्स जीओची टॉवर उभारणी या मुद्यावरून पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर बंदला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी रामदास रायपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विजय चंदावार, केशव जेनेकर, गोपाल सातपुते, प्रभाकर गट्टुवार, अशोक संगीडवार, श्रीराम तोडासे, रमेश वेगीनवार, अरुण दंतुलवार, नीलकंठ बलकी, प्रा.माणिक अंधारे, द्रौपदी काटकर, कुमुद राणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने ज्या तीन त्रृट्या दर्शविल्या, त्या वेळेत पूर्ण न केल्याबद्दल या बैठकीत सरकारची तीव्र शब्दात निंदा करण्यात आली. सरकारच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे सांगत चंद्रपूर बंद सफल करण्याचे आवाहन करण्यात आले.चंद्रपूर बंदला काँंग्रेसचे समर्थनचंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालय याच सत्रात सुरू करण्याच्या मागणीला आणि मनपाने मंजुरी दिलेल्या रिलायन्स जीओ इन्ंफोकॉमचे टॉवर उभारण्याच्या आणि भूमिगत केबल टाकण्याचा ठराव रद्द करण्याच्या मागणीला समर्थन देत शहरातील काँग्रेसमधील गटही उद्याच्या बंदमध्ये सक्रियपणे उतरला आहे. धनशक्तीच्या बळावर रिलायन्स कंपनीचे ठेकदार मनपाला टॉवर उभारण्यासाठी बाध्य करीत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा आरोग्य संघर्ष समितीने पुकारलेल्या बंदमध्ये काँग्रेस आणि संलग्न असलेल्या संगठनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असा उल्लेख असलेल्या पत्रकातून गजानन गावंडे यांनी केला आहे. शहरातील चार लाख नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने त्या विरोधात सकाळी १० वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत व त्यानंतर परत गांधी चौक असा मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या सोबतच सकाळी १० वाजता न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानातून मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. ती विश्रामगृहामार्गे गांधी चौक- जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल. यात सहभागी होण्याची विनंती गजानन गावंडे गुरूजी यांनी केली आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबायाच विषयावर इंडियन मेडिकल असोसिएशननेही पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारच्या सावत्र वागणुकीची त्यांनीही निंदा केली. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले, हा चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय आहे. २५ एकर जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरक्षित करणारा चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. आरोग्य विभाग आणि उच्च शिक्षण विभाग या दोन्ही विभागांच्या मतभीन्नतेमुळे चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालय अडले आहे. त्यावर राज्य सरकार मार्ग काढत नसल्याने उद्याच्याचंद्रपूर बंदला आपल्या संघटनेचे नैतिक समर्थन आहे. मात्र वैद्यकीय सेवा ही अत्यावश्य कसेवा असल्याने रूग्णालये सुरू ठेव, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आयएमए चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. अशोक भुक्ते, डॉ. महावीर सोईतकर आदी उपस्थित होते.चंद्रपूर चेंबर्स आॅफ कॉमर्सचे समर्थनया बंदला चंद्रपूर चेंबर्स आॅफ कॉमर्सनेही पाठिंबा दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री चव्हाण यांना एक निवेदन पाठवून आपल्या भावना कळविल्या आहेत. संघठनेचे अध्यक्ष सीए हर्षवर्धन सिंघवी यांच्याकडून प्रसिद्धीसाठी आलेल्या पत्रकातून, मनपाच्या परवानगीने शहरात येवू घातलेल्या १०० टॉवरमुळे नागरिकांच्या आरोग्याला भविष्यात गंभीर धोका होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालाच्या मार्गात राज्य सरकार अडथळा घालत असल्याची बाब दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या बाबीचा विरोध करण्यासाठी व्यापारी बांधव आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शुक्रवारी निषेध पाळणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)