मनपाने केला पाच लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:57+5:30

कोरोनाचा राज्यात शिरकाव होण्यापूर्वीच साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ अंतर्गत राज्य सरकारने प्रतिबंधात्मक नियम लागू केले. या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मनपा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे.

Manpa recovered a fine of Rs 5 lakh | मनपाने केला पाच लाखांचा दंड वसूल

मनपाने केला पाच लाखांचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन करणे भोवले : चंद्रपुरातील २ हजार ३९७ व्यक्तींवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्र्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण कायद्यातंर्गत लागू केलेले नियम धाब्यावर ठेवणाऱ्या शहरातील २ हजार ३९७ व्यक्तींकडून महानगर पालिकेच्या पथकाने आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ७९० लाखांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा राज्यात शिरकाव होण्यापूर्वीच साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ अंतर्गत राज्य सरकारने प्रतिबंधात्मक नियम लागू केले. या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मनपा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे. मात्र, काही व्यक्ती मास्क न लावता शहरात सर्रास फिरताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकून इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचवत आहेत. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी दुकानात कुठलीच उपाययोजना न करता विनापरवानगी दुकान सुुरू ठेवणे आणि अवैध खर्रा विक्री करण्याच्या घटना वाढीस आल्या आहेत. परिणामी, मनपा प्रशासनाने आॅगस्ट महिन्यापासून कारवाईची मोहीम गतिमान केली.
साथरोग नियंत्रण कायद्यानुसार तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसताच कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे तसेच अवैध खर्रा विक्री करणारे आढळुन आल्याने महानगर पालिकेतर्फे दंडात्मक कारवाई केली जात आहे.
मनपाकडून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. मात्र, काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा १९४ व्यक्तींवर मनपाने कारवाई केली. २३ एप्रिलपासून कारवाई मोहीम सुरू असून मनपाच्या तीनही झोनमार्फत सक्तीने राबविले जातआहे. विशेष म्हणजे कारवाई केल्यानंतर मास्क लावण्याची समज देण्यात येऊन मनपाकडून प्रत्येक व्यक्तीला २ मास्क दिले जात आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

तीनही झोनमध्ये कारवाई पथक
चंद्रपूर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील तीनही झोनमध्ये कारवाई पथक गठित करण्यात आले. यामध्ये क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे, सुभाष ठोंबरे, अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत, स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे, विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे, संतोष गर्गेलवार, जगदीश शेंदरे आदींचा समावेश आहे.

Web Title: Manpa recovered a fine of Rs 5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.