शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केले ठार; नागभीड तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 13:49 IST

ही बाब बाजूलाच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. या आरडाओरडीने वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत सर्वच संपले होते.

नागभीड (चंद्रपूर) : कुटुंबासह तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या व्यक्तीवर पट्टेदार वाघाने हल्ला करून एका व्यक्तीस जागीच ठार केले. ही घटना नागभीड तालुक्यातील नवेगाव ( हुंडेश्वरी ) येथे गुरुवारी सकाळी ७ च्या दरम्यान घडली. या घटनेने वनविभागात व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आडकू मारोती गेडाम (६०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आडकू सकाळीच पत्नी, पुतण्या आणि मूलीसह तेंदूपत्ता संकलनासाठी गावानजीकच्या जंगलात गेला होता. तेंदूपत्ता संकलनात व्यस्त असतांना वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. ही बाब बाजूलाच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.

या आरडाओरडीने वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत सर्वच संपले होते. लगेच ही माहिती वनविभागास देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळ गाठून मोक्का पंचनामा केला आणि पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूर