शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आ. देवतळेंना रील बनवणे पडले महागात ! ताडोबात मोबाइल वापरणे नियमबाह्य असतांनाही चक्क बनवली रील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 19:02 IST

Chandrapur : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नियम धाब्यावर ठेवणे भाजप आमदार करण देवतळे यांना चांगलेच महागात पडले आहे. 'कोअर' व 'बफर' क्षेत्रातील सफारीदरम्यान मोबाइल बाळगण्यास व वापरण्यास सक्त मनाई असतानाही त्यांनी चक्क 'रील्स' तयार करून सोशल मीडियावर शेअर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नियम धाब्यावर ठेवणे भाजप आमदार करण देवतळे यांना चांगलेच महागात पडले आहे. 'कोअर' व 'बफर' क्षेत्रातील सफारीदरम्यान मोबाइल बाळगण्यास व वापरण्यास सक्त मनाई असतानाही त्यांनी चक्क 'रील्स' तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. या प्रकारानंतर वन्यजीवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व्ह कंझरव्हेशन फाउंडेशन, चंद्रपूर अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून यापूर्वीच पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ताडोबा प्रशासनाच्या नियमांनुसार सफारीदरम्यान मोबाइल सोबत बाळगणे नियमबाह्य आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. आमदार करण देवतळे यांनी बफर क्षेत्रातील 'निमढेला' गेटवरून सपत्नीक सफारी करताना मोबाइलचा वापर केला होता. व्हिडीओ शूट करताना जीपच्या आरशात मोबाइलचे प्रतिबिंब दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. मोबाइल बाळगणे किंवा वापरणे पूर्णतः प्रतिबंधित आहे. तरीही सफारीदरम्यान, वाघाचे आणि जंगलाचे फोटो काढण्याचा नादात आमदार देवतळे यांनी सुरक्षेचे सर्व नियमधाब्यावर बसविले. वाघाच्या नैसर्गिक अधिवासात नियमांचे उल्लंघन करणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. हा प्रकार घडल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ३० जानेवारीलाच आमदार देवतळे यांच्याकडून ५ हजारांचा दंड वसूल केला. 

"आमदार करण देवतळे यांनी ताडोबातील नियम मोडला. याबद्दल त्यांना तेव्हाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे."- प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प.

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Fined for Illegally Filming Reels in Tadoba Tiger Reserve

Web Summary : BJP MLA Karan Devtale fined ₹5,000 for violating Tadoba's mobile usage ban during safari. He filmed reels in the core zone, sparking outrage and violating wildlife protection laws. Forest officials collected the fine on January 30th.
टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प