चिमूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्व व्यवस्था कोलमडून गेल्या आहेत. बेड्स उपलब्ध नाही, रुग्णांना दवाखान्याबाहेर २४ तास उभे राहावे लागत आहे. एकूणच चिंताजनक अवस्था निर्माण झाली आहे. मृत्यूदर वाढत चालला असून, तालुका प्रशासन व आरोग्य विभागाचे याकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. चिमूर येथून प्रत्येक जिल्हा मुख्यालय व जिल्हा आरोग्य यंत्रणांचे अंतर १०० किमीच्या अधिक असून, इथे उपचार होणे कठीण आहे. चिमूर येथे सर्व सुविधांनी युक्त खासगी दवाखानेसुद्धा नाहीत. सद्यस्थितीत कोविड सेंटरला पाहिजे, त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. ऑक्सिजन साठा पूर्णवेळ पुरत नसल्याने अतिगंभीर समस्या निर्माण होऊन रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात तातडीने २५ बेड्स सेंट्रलाइझड्स ऑक्सिजन सप्लाय पद्धतीने रुग्णांसाठी उपलब्ध झाल्यास कोरोना आटोक्यात येण्यास मोठी मदत होईल. यासाठी आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच प्रशासनाकडे बेड्सची मागणी केली आहे.
चिमुरात २५ ऑक्सिजन सेन्ट्रलाईझ बेड तयार करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:28 IST