शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २५ हजार ६२५ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

विमा हप्ता, खर्चाची मर्यादा, मेडिकल प्रोसिजर्स, आर्थिक तरतूद, योजनेतील अंगीकृत रूग्णालये, रूग्णालयांनी सादर केलेले दावे व योजनेचा करार कसा असावा, याबाबतची संपूर्ण माहिती ४ ऑगस्ट २०१६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात नमुद आहे. जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ ते जानेवारी २०२० पर्यंत २५ हजार ६२५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक ६ हजार ४३० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

ठळक मुद्देसात वर्षांची स्थिती : पाच रूग्णालयांना मिळाले ४७ कोटी १२ लाख ९६ हजार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील कुटुंंबांना गंभीर व खर्चिक आजारांवर मोफत करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ ते जानेवारी २०२० पर्यंत २५ हजार ६२५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयासह अन्य चार खासगी रूग्णालयांनी क्लिेम अमाऊंट म्हणून म्हणून तब्बल ४७ कोटी १२ लाख ९६ हजार ६२२ रूपयांचा लाभ घेतला आहे.राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपल्यानंतर याच योजनेच्या नवीन स्वरूपाला ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ असे नाव देण्यात आले आहे. ही आरोग्य योजना राज्यात २ ऑक्टोबर २०१६ पासून राबविली जात आहे. या योजनेतंर्गत दारिद्रयरेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्ण योजना, शिधापत्रिकाधारक व दारिद्रयरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक (१ लाखापर्यंत उत्पन्न असलेली) कुटुंबे (शासकीय, निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून) याशिवाय शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो. लाभार्थ्यासाठी ओळख पटविण्यासाठी शासनाने आधारकार्ड व अन्य पुरावे निर्धारित केली आहेत. विमा हप्ता, खर्चाची मर्यादा, मेडिकल प्रोसिजर्स, आर्थिक तरतूद, योजनेतील अंगीकृत रूग्णालये, रूग्णालयांनी सादर केलेले दावे व योजनेचा करार कसा असावा, याबाबतची संपूर्ण माहिती ४ ऑगस्ट २०१६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात नमुद आहे. जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ ते जानेवारी २०२० पर्यंत २५ हजार ६२५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक ६ हजार ४३० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.२५ हजार ६२५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय आणि वासाडे हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, मुसळे चाईल्ड हॉस्पिटल, सीएचएल या खासगी रूग्णालयांना क्लिेम रक्कम म्हणून तब्बल ४७ कोटी १२ लाख ९६ हजार ६२२ अदा करण्यात आल्याचे अहवालातून पुढे आले आहे.खर्चाची मर्यादायोजनेतंर्गत समाविष्ट उपचार पद्धतीवरील उपचारांसाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रतिवर्ष प्रति कुटुंब दोन लाख तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा प्रति वर्ष प्रतिकुटुंब तीन लाख आहे. यामध्ये दात्यांचाही समावेश असेल. योजनेतंर्गत उपचार सुरू होण्यापूर्वी असलेल्या आजारांचा समावेश राहील.योजनेतील शस्त्रक्रिया‘महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कान, नाक, घसा, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग, पोट व जठर, कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी, बालरोग, प्रजनन व मूत्ररोग शस्त्रक्रिया, मज्जातंतू विकृती शास्त्र, कर्करोग शस्त्रक्रिया, वैद्यकीय कर्करोग, रेडीओथेरपी कर्करोग, त्वचा प्रत्यारोपण, जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस जोखिमी देखभाल, जनरल मेडिसीन, संसर्गजन्य रोग, बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन हृदयरोग, नेफ्रोलोजी, न्युरोलोजी, पल्मोनोलोजी, चर्मरोग चिकित्सा, रोमेटोलोजी, इंडोक्रायनोलोजी, मेडिकल गॅस्ट्रोइंट्रोलोजी आदी ३० विशेष सेवातंर्गत ९७१ उपचार, शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.

टॅग्स :Healthआरोग्य