चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; भाजप केवळ दोन जागांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:02 PM2020-01-10T14:02:41+5:302020-01-10T15:17:39+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नगराध्यक्ष पदासह काँग्रेस आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

maharashtra zp Election 2020; Congress has a clear majority in Chandrapur district; BJP in only two seats | चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; भाजप केवळ दोन जागांवर

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; भाजप केवळ दोन जागांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नगराध्यक्ष पदासह काँग्रेस आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता टेकाम 1104 मताधिक्याने विजयी झाल्या. काँग्रेसचे 5 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना व शेतकरी संघटना एकत्र लढली. शिवसेनेचे 5 तर शेतकरी संघटनेचा 1 उमेदवार निवडून आले आहेत.

गडचांदूर नगर परिषदेत 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 7, काँग्रेस 5, शिवसेना 2, भाजप 3 असे पक्षीय बलाबल होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यक्ष पद होते. यावेळी आघाडीत हर पद काँग्रेसला मिळाले. आघाडीने पालिकेवर वर्चस्व कायम राखले. 2015 पासून अडीच वर्षे काँग्रेस, भाजप व शिवसेना युती होती. त्यावेळी नगराध्यक्षपद काँग्रेसकडे होते. उपनगराध्यक्षपद हे शिवसेनेकडे होते. नंतरचे अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप सत्तेवर आली. यावेळी नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्ष पद भाजपकडे होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व गटनेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व पिरिपा आघाडी होती. यामध्ये आघाडीने नगराध्यक्ष पदासह 10 जागा जिंकल्या. यात नगराध्यक्ष पद काँग्रेस तसेच काँग्रेस 5, राष्ट्रवादी काँग्रेस 4 नगरसेवक निवडुन आले तर भाजपला 2 जागाच जिंकता आल्या. शिवसेना 5 तर शेतकरी संघटनेने 1 जागा जिंकली. शिवसेना, शेतकरी संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टीची युती होती. भाजप स्वतंत्र लढली.

Web Title: maharashtra zp Election 2020; Congress has a clear majority in Chandrapur district; BJP in only two seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.